CIDCO Bumper Lottery Of 25 Thousand Houses Saam Tv
मुंबई/पुणे

CIDCO Lottery 2024: दसऱ्याआधी सिडकोच्या २५ हजार घरांची बंपर लॉटरी, आवडत्या घराची कशी कराल निवड? वाचा सविस्तर

CIDCO Bumper Lottery Of 25 Thousand Houses: सिडकोच्या २५ हजार घरांची लॉटरी लवकरच निघणार आहे. या लॉटरीबाबत जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर...

Priya More

Navi Mumbai CIDCO Lottery Latest Updates in Marathi: नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दसऱ्याआधी सिडको २५ हजार घरे विक्रीसाठी काढणार आहे. निवडा तुमच्या आवडीचे घर या संकल्पनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हत्वाचे म्हणजे अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला ही घरं खरेदी करता येणार आहे. या घरांच्या किमती बाजारभावापेक्षा कमी असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही खासच लॉटरी असणार आहे.

दसऱ्याआधी लागणार लॉटरी -

सिडकोच्या लॉटरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई शहरातील विविध भागांमध्ये सिडकोकडून २७ ठिकाणी ६७ हजार घरं बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना 'महारेरा'ची परवानगी मिळाली आहे. या घराचे बांधकाम देखील प्रगतीपथावर आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दसऱ्याच्या आधी यामधील २५ हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. यामधील अनेक घरं ही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असणार आहेत.

कुठे असणार सिडकोची घरं?

सिडकोची ही घरं तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ हे आज विविध भागांमधील गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामाची पाहणी करणार आहेत. सिडकोच्या या लॉटरीमध्ये नागरिकांना त्यांच्या आवडीचे घर निवडण्याची संधी असणार आहे. त्यामुळे याचा नागरिकांना चांगला फायदा होईल.

आवडीचे घर निवडण्याची संधी -

महत्वाचे म्हणजे, सिडकोची ही घरं खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. सिडकोची ही घरं विक्रीसाठी 'बुक माय सिडको होम' अर्थात 'निवडा तुमच्या आवडीचे घर' या संकल्पनेचा अवलंब करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोकडून ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर त्यांच्या आवडीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी ही खूपच चांगली पर्वणी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT