Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज; लोकल गाड्या वेळेवर धावणार, मध्य रेल्वेचा जबरदस्त प्लान; नेमका काय? जाणून घ्या...

Mumbai Local: मध्य रेल्वे मार्गावर आता लोकल वेळेत धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून यासाठी जबरदस्त प्लान तयार करण्यात आला आहे. कल्याण ते कर्जतदरम्यान १० रेल्वे क्रॉसिंग बंद करत त्याठिकाणी उड्डाणपूल बांधले जाणार आहेत.

Priya More

Summary -

  • मध्य रेल्वे मार्गावर लवकरच लोकल वेळेत धावणार आहेत

  • कल्याण ते कर्जत दरम्यान १० रेल्वे फाटकं बंद होणार

  • रेल्वे क्रॉसिंगवर १० उड्डाणपूल उभारले जाणार

  • डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार

मयुरेश कडव, वांगणी

मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर लवकरच लोकल वेळेत धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट होईल. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जबरदस्त प्लान तयार केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर १० रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्रॉसिंग बंद होत त्याठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. कल्याण ते कर्जत दरम्यान हे उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. लेटलतिफ कारभार सुधारण्यासाठी रेल्वे क्रॉसिंग बंद होणार आहेत. कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून डिसेंबरपासून कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाचा नेमका प्लान काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचा लेटलतिफ कारभार सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं कल्याण ते कर्जत दरम्यानचे १० रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहे. त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमधील रेल्वे फाटक बंद होणार असून सोयीसाठी रेल्वे उड्डाणपुलांची निर्मिती केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वे फाटक उघडल्यानंतर ते बंद होण्यासाठी ३ ते ७ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे लोकल तसेच एक्स्प्रेसचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेने कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले १० रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या १० रेल्वे फाटकांपैकीच एक असलेलं वांगणी रेल्वे फाटकही बंद होईल. नागरिकांच्या सोयीसाठी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येईल.

वांगणीमधील ४ गेट, नेरळ येथील १, भिवपुरी येथील ३ आणि कर्जत येथील २ एलसी गेट बंद केले जातील आणि त्याऐवजी ओव्हरब्रिज बांधले जातील. त्यामुळे या रेल्वे स्थानकांजवळच्या गावांना चांगला फायदा होईल. या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, 'उपनगरीय मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग दिवसातून ४० ते ४५ वेळा उघडले जातात. त्यामुळे ८९४ लोकलपैकी किमान ७० ते ७५ टक्के लोकल थांबतात. त्याचा परिणाम लोकलच्या वक्तशीरपणावर होतो, असं रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

Bigg Boss 19: धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; म्हणाला, 'उद्या त्यांचा वाढदिवस आणि...'

SCROLL FOR NEXT