

सीएसएमटी कर्मचारी आंदोलनादरम्यान मध्य रेल्वेवर दुर्दैवी अपघात
सँडहर्स्ट रोड आणि भायखळादरम्यान लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू
रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरु
घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीती आणि संताप
मुंबई : एकीकडे सीएमएमटी रेल्वे स्टेशनवर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु असताना रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट आणि भायखळादरम्यान अपघात झाला. फास्ट लोकलने ४ प्रवाशांना उडवलं. या घटनेत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील सीएसएमटी (CSMT) स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. या आंदोलनाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. अर्धा ते एक तास लोकल उशिरानं धावत आहेत. लोकल खोळंब्यामुळं मध्य रेल्वेवरील महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
लोकल उशिरानं धावत असल्यानं कल्याण, ठाणे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. सीएसएमटी स्थानकातील आंदोलनाचा फटका ठाण्यातील प्रवाशांनाही बसला आहे. ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर प्रचंड गर्दी झाली आहे.
रेल्वे आंदोलनामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यानंतर सँडहर्स्ट रोड स्टेशनवरून काही प्रवासी रुळावरून चालत होते. त्याचवेळी लोकलने धडक दिल्याने तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
अंबरनाथ फास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं. लोकलने एकूण ४ प्रवाशांना उडवलं. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यांचे मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.