

CSMT स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा आंदोलन, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातील इंजिनीअर्सवर गुन्हा दाखल, युनियनकडून आंदोलन
लोकल ट्रेन प्रवाशांना सुमारे एक तास उशीराने धावताहेत, स्टेशनवर शेकडो प्रवासी अडकले
आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, प्रवाशांची रेल्वेवर टीका
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या आंदोलनामुळे रेल्वेची वाहतूक सुमारे एक तास उशिराने धावत आहेत.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील इंटरनल चौकशीमध्ये दोन इंजिनीअर अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा युनियनने विरोध केला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने थेट आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरच रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनामध्ये मोटरमन कर्मचारी देखील सहभागी झाल्याची माहिती मिळत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. शेकडो प्रवासी मागील एक तासांपासून रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत आहे. या आंदोलनावर स्टेशनवर हजारोंची गर्दी झाली आहे. लोकलच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांवर टीका होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सीएमएमटी रेल्वे स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या आहेत. यामुळे घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, त्यांच्यावरील अन्यायकारक कारवाई खपवून घेणार नाही. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे प्रवाशांना वेठीस का धरता, असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे संघटनांना विचारला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.