Mumbai Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वांगणी-बदलापूरमध्ये रेल्वे रुळाला तडा

Central Railway Delay : रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कल्याण-सीएसएमटी, कर्जत-खोपोली या मार्गावरील सेवा प्रभावित झाली आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local Trainx
Published On
Summary
  • वांगणी-बदलापूरदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प.

  • कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी.

  • अनेक कर्मचाऱ्यांना उशीर झाल्यामुळे लेट मार्कची शक्यता.

  • रेल्वे प्रशासनाकडून रुळ दुरुस्ती सुरू; वाहतूक लवकरच सुरळीत होणार.

Mumbai Local Train Latest News : वांगणी आणि बदलापूरमध्ये रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत लोकल वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे दिसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक बदलापूर आणि वांगणीदरम्यान ठप्प झाली आहे. याचा परिणाम एक्सप्रेस गाड्यावरही झाल्याचे समोर आले आहे. सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना लेट मार्क लागणार आहे. (Mumbai local train service disrupted due to track crack)

मध्य रेल्वेच्या वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने आज सकाळी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. रुळाला तडा गेल्याने कल्याण ते सीएसएमटी आणि कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण आदी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली.

Mumbai Local Train
Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

अनेक प्रवासी कार्यालयात वेळेवर पोहोचू शकले नाहीत, तर काहींना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, दुसरे इंजिन मागवून रुळ दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “ऐन सकाळी अशी अडचण येणे खूप त्रासदायक आहे. रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली. लवकरच मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

Mumbai Local Train
Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com