
महाराष्ट्रातून सध्या १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत.
मुंबई, पुणे आणि नागपूर हे प्रमुख प्रस्थान बिंदू आहेत.
प्रत्येक गाडीचे थांबे, अंतर आणि वेळ निश्चित आहे.
कोल्हापूर मार्गावर नवीन वंदे भारत लवकरच सुरू होणार आहे.
Vande Bharat Express Trains List : वंदे भारत एक्सप्रेस ही भारताच्या रेल्वे इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल मानले जातेय. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित असलेली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांचा वेळ तर वाचवतेच, शिवाय आरामदायी प्रवासही करता येत. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर पहिली हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. वंदे भारत एक्सप्रेस देशातील महानगरे, तीर्थक्षेत्रे आणि आर्थिक केंद्रांना जोडते. महाराष्ट्रातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई-सोलापूर यासारख्या मार्गावर वंदे भारत धावते. देशात सध्या ७२ वंदे भारत एक्सप्रेस वंदे भारत धावतात. महाराष्ट्रात सध्या १० वंदे भारतात धावतात, पुढील काही दिवसांत यामध्ये आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे.
15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सध्या देशभरात 72 वंदे भारत गाड्या कार्यरत असून, 144 सेवा देशाच्या विविध भागांना जोडत आहेत. नवी दिल्ली, वाराणसी, प्रयागराज, श्री माता वैष्णोदेवी कटरा, पुणे, मुंबई, अहमदाबाद, सिकंदराबाद, विशाखापट्टणम, चेन्नई आणि कोइंबतूर यांसारख्या प्रमुख शहरांना वंदे भारतने जोडले. प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचतोय. महाराष्ट्रातही वंदे भारत एक्सप्रेसने आपला ठसा उमटवला आहे. मुंबई ते गांधीनगर आणि मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवरील वंदे भारत गाड्या विशेष लोकप्रिय झाल्या आहेत. मुंबईहून गोवा आणि पुणे येथून सिकंदराबादपर्यंतच्या मार्गांवरही नवीन वंदे भारत गाड्यांची मागणी वाढत आहे.
महाराष्ट्रात सध्या १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत. कोल्हापूर वंदे भारत लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल माहिती जाणून घेऊयात..
1. मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल
अंतर: 522 किमी
प्रवास वेळ: सुमारे 6 तास 25 मिनिटे
वेळ: मुंबई सेंट्रलहून सकाळी 6:00 वा. सुटते, गांधीनगरला दुपारी 12:25 वा. पोहोचते.
गांधीनगरहून दुपारी 2:05 वा. सुटते, मुंबईला रात्री 8:25 वा. पोहोचते.
थांबे: बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद
2. मुंबई सीएसएमटी - सोलापूर
अंतर: 455 किमी
प्रवास वेळ: 6 तास 30 मिनिटे
वेळ: मुंबईहून सकाळी 6:00 वा. सुटते, सोलापूरला दुपारी 12:30 वा. पोहोचते.
सोलापूरहून दुपारी 3:00 वा. सुटते, मुंबईला रात्री 9:30 वा. पोहोचते.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, पुणे
3. मुंबई सीएसएमटी - साईनगर शिर्डी
अंतर: 340 किमी
प्रवास वेळ: 5 तास 20 मिनिटे
वेळ: मुंबईहून सकाळी 6:00 वा. सुटते, शिर्डीला दुपारी 11:20 वा. पोहोचते.
शिर्डीहून दुपारी 3:00 वा. सुटते, मुंबईला रात्री 8:20 वा. पोहोचते.
थांबे: दादर, ठाणे, नाशिक रोड
4. मुंबई सीएसएमटी - मडगाव (गोवा)
अंतर: 581 किमी
प्रवास वेळ: 7 तास 45 मिनिटे
वेळ: मुंबईहून सकाळी 5:25 वा. सुटते, मडगावला दुपारी 1:10 वा. पोहोचते.
मडगावहून दुपारी 1:50 वा. सुटते, मुंबईला रात्री 9:35 वा. पोहोचते.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी
5. मुंबई सीएसएमटी - जालना
अंतर: 430 किमी
प्रवास वेळ: 6 तास 50 मिनिटे
वेळ: मुंबईहून सकाळी 6:35 वा. सुटते, जालना येथे दुपारी 1:25 वा. पोहोचते.
जालना येथून दुपारी 2:00 वा. सुटते, मुंबईला रात्री 8:50 वा. पोहोचते.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद
6. नागपूर - बिलासपूर
अंतर: 412 किमी
प्रवास वेळ: 5 तास 30 मिनिटे
वेळ: नागपूरहून दुपारी 2:05 वा. सुटते, बिलासपूरला रात्री 7:35 वा. पोहोचते.
बिलासपूरहून सकाळी 6:45 वा. सुटते, नागपूरला दुपारी 12:15 वा. पोहोचते.
थांबे: गोंदिया, राजनांदगांव, दुर्ग, रायपूर
7. नागपूर - इंदूर
अंतर: 650 किमी
प्रवास वेळ: 8 तास 30 मिनिटे
वेळ: नागपूरहून सकाळी 6:00 वा. सुटते, इंदूरला दुपारी 2:30 वा. पोहोचते.
इंदूरहून दुपारी 3:00 वा. सुटते, नागपूरला रात्री 11:30 वा. पोहोचते.
थांबे: बेटूल, इटारसी, भोपाल, उज्जैन
8. नागपूर - सिकंदराबाद
अंतर: 575 किमी
प्रवास वेळ: 7 तास 15 मिनिटे
वेळ: नागपूरहून सकाळी 5:00 वा. सुटते, सिकंदराबादला दुपारी 12:15 वा. पोहोचते.
सिकंदराबादहून दुपारी 1:00 वा. सुटते, नागपूरला रात्री 8:20 वा. पोहोचते.
थांबे: सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशहा, रामगुंडम, काझीपेठ
9. पुणे - कोल्हापूर
अंतर: 326 किमी
प्रवास वेळ: 5 तास 25 मिनिटे
वेळ: पुण्याहून दुपारी 2:15 वा. सुटते, कोल्हापूरला सायंकाळी 7:40 वा. पोहोचते.
कोल्हापूरहून सकाळी 8:15 वा. सुटते, पुण्याला दुपारी 1:30 वा. पोहोचते.
थांबे: सातारा, कराड, किर्लोसकरवाडी, सांगली, मिरज
10. पुणे - हुबळी
अंतर: 558 किमी
प्रवास वेळ: 8 तास 30 मिनिटे
वेळ: पुण्याहून दुपारी 2:15 वा. सुटते, हुबळीला रात्री 10:45 वा. पोहोचते.
हुबळीहून सकाळी 5:00 वा. सुटते, पुण्याला दुपारी 1:30 वा. पोहोचते.
थांबे: सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड
11. मुंबई - कोल्हापूर (लवकरच सुरू होण्याची शक्यता)
अंतर: सुमारे 518 किमी
प्रवास वेळ: अंदाजे 7 तास
थांबे: पुणे, सातारा, सांगली, मिरज (संभाव्य)
भारतामधील महत्त्वाच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची नावे -
नवी दिल्ली - वाराणसी
नवी दिल्ली - श्री माता वैष्णो देवी कटरा
चेन्नई एग्मोर - नागरकोईल
नवी दिल्ली - अजमेर
नवी दिल्ली - अंब अंदौरा
चेन्नई - मैसूर
नागपूर - बिलासपूर
हावडा - न्यू जलपायगुडी
मुंबई सेंट्रल - गांधीनगर कॅपिटल
मुंबई सीएसएमटी - सोलापूर
मुंबई सीएसएमटी - साईनगर शिर्डी
जालना - मुंबई सीएसएमटी
अजमेर - दिल्ली कॅन्ट
उदयपूर सिटी - जयपूर
जोधपूर - साबरमती
विशाखापट्टणम - सिकंदराबाद
काचिगुडा - यशवंतपूर
पाटणा - हावडा
गोरखपूर - लखनौ चारबाग
तिरुवनंतपुरम - कासारगोड
आनंद विहार टर्मिनल - अयोध्या कॅन्ट
बेंगळुरू - शिवमोग्गा
मुंबई - नांदेड
मेरठ - वाराणसी
श्री माता वैष्णो देवी कटरा - श्रीनगर
दिल्ली - श्रीनगर
चेन्नई - विजयवाडा
चेन्नई - कोयंबटूर
बेंगळुरू - मदुराई
हुबळी - पुणे
गोरखपूर - प्रयागराज
राणी कमलापती (हबीबगंज) - हजरत निजामुद्दीन
हजरत निजामुद्दीन - खजुराहो
नागपूर - इंदौर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.