Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

Manikrao Kokate : अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून झापले असून त्यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. सरकारची प्रतिमा धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ajit pawar
ajit pawar Saam Tv
Published On
Summary
  • कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून फटकारले.

  • “बोलताना भान ठेवा, सतत चुका करता, कितीदा माफ करणार?” असे म्हणत अजित पवार यांनी कान टोचले.

  • आज सकाळी मंत्रालयात कोकाटे यांनी अजित पवारांची भेट घेतली, त्यावेळी ही झापाझाप झाली.

  • वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची बदनामी होत असल्याची अजित पवारांची नाराजी.

  • अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले.

Ajit Pawar sharply rebuked Agriculture Minister Manikrao Kokate : बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते. सतत चुका करता.. कितीदा चुकणार आणि कितीदा माफ करणार, असे म्हणत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. आज सकाळी कृषीमंत्रि माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून झापलेय. अजित पवार यांनी यावेळी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले.

वादग्रस्त वक्तव्य आणि अधिवेशनात रमी खेळणारे कृषीमंत्रि माणिकराव कोकेटा यांच्यावर विरोधकांकडून धारेवर धरले जात आहे. आज मंत्रालयात कोकाेटे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलेच झापले. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवा. तुम्हाला कितीवेळा माफ करायचे, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना सांगितले.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणा विरोधकांकडून करण्यात येत आहे. रमी प्रकरणावरून स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य करत वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे कोकाटे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का? या चर्चेने जोर धरला होता. आता अजित पवार यांनी कोकाटे यांना झापत यामध्ये भर घातली आहे. माणिकराव कोकाटे यांना अभय मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील सहा महिन्यात माणिकराव कोकाटेंमुळे सरकार पाच ते सहा वेळा वादात अडकले आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ajit pawar
Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात ७ आरोपींच्या घराची झडती, पोलिसांना ड्रग्ज सापडलं नाही, मोबाईल-लॅपटॉप जप्त

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या डिनर पार्टीवरून रोहित पवार यांनी टीकेचा बाण सोडला होता. हॉटेलमध्ये डीनर पार्टी असेल तर हा कोकाटेंचा सेंड ऑफ असेल असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

ajit pawar
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर

महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर अवघ्या चार महिन्यात पहिली विकेट पडली होती. धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये आणखी पाच मंत्रि विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे. आज अजित पवार स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी कृषीमंत्री कोकाटेंना नारळ देणार की अभय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

ajit pawar
Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com