
पुण्याच्या खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणातील ७ आरोपींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली
आरोपींच्या घरातून कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत.
झडतीदरम्यान पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड जप्त केले.
आरोपींनी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे पार्टीचे प्लॅनिंग केल्याची माहिती तपासात उघड.
Pune Kharadi rave party police update : पुण्यातील खराडी येथील बहुचर्चित रेव्ह पार्टी प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणातील सातही आरोपींच्या घराची झडती घेतली आहे. यामध्ये डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर सहा जणांच्या घरांचा समावेश आहे. पोलिसांच्या या झडतीदरम्यान कोणतेही अमली पदार्थ आढळले नाहीत. मात्र, पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि मेमरी कार्ड जप्त केले आहेत. तपासातून असे समोर आले आहे की, आरोपींनी पार्टीपूर्वी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे एकमेकांशी संपर्क साधला होता. शुक्रवारी खराडी येथील बर्ड स्टे सूट येथे झालेल्या पार्टीत या सात पैकी दोन जण उपस्थित होते. हे सूट २५ ते २८ तारखेपर्यंत बुक करण्यात आल्याचे समोर आले आहे. (No drugs found in Pranjal Khewalkar house search)
पुण्यातील ड्रग्स पार्टी प्रकरणात डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. पोलिस कोठडीत वाढ होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार, याबाबत पोलिस आणि आरोपींचे वकील आपापली बाजू मांडणार आहेत. पोलिस कोठडीसाठी युक्तिवाद करण्याची शक्यता आहे, तर आरोपींचे वकील जामीन आणि न्यायालयीन कोठडीसाठी प्रयत्न करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज सकाळी १० वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर खडसे कालपासून पुण्यात आहेत. काल त्यांनी कायदेतज्ञ असिम सरोदे यांची भेट घेतली होती. खडसे आज पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.