Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Mumbai Central Railway Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे गाड्या पाहूनच प्रवास करावा.
Central Railway Mega Block
Central Railway Mega BlockSaam Tv
Published On
Summary

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

विद्याविहार ते ठाणे दरम्यान मेगा ब्लॉक

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत मध्य रेल्वेवर उद्या म्हणजेच रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहे. उद्या घराबाहेर पडताना रेल्वेचं वेळापत्रक नक्की बघून जा.

मध्य रेल्वे, मुंबई विभाग, रविवार, १९.१०.२०२५ रोजी विद्याविहार आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान मुख्य मार्गावरील उपनगरीय सेक्शन्सवरील ५वी आणि ६वी मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांच्या दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक विभाग आणि वेळ:

विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर सकाळी ०८.०० ते दुपारी १३.३० पर्यंत ब्लॉक.

Central Railway Mega Block
Maharashtra New Railway Line: मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! दोन रेल्वे मार्गांना मंजुरी; कोणाला होणार फायदा?

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन:

खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानकावर पुन्हा वळवल्या जातील आणि त्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिहागड एक्सप्रेस

12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

13201पाटणा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस

17221काकीनाडा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस

12126पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस

22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

12168 बनारस – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस

12321हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

12812 हाटिया – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस

11012धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन:

11055 लोकमान्य तिळक टर्मिनस – गोरखपूर गोडान एक्सप्रेस

11061लोकमान्य तिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस

16345 तिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

17222लोकमान्य तिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस

Central Railway Mega Block
Woman Deliver Baby at Mumbai Ram Mandir Railway Station: रिअल लाइफ रँचो! प्रवासदरम्यान महिलेला प्रसुती कळा, मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/बांद्रा डाउन हार्बर मार्गवर ११.४० ते १६.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/ बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गवर ११.१० ते १६.१० पर्यंत ब्लॉक राहील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून १०.४८ ते ४.४३ पर्यंत बांद्रे /गोरेगावला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष गाड्या दर २० मिनिटांनी चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी १८.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्गवर आणि वेस्टर्न रेल्वे मार्गवर प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

Central Railway Mega Block
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, कधी अन् कुठे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com