Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Metro: मूहूर्त ठरला! बीकेसी ते वरळी मेट्रो या दिवशी धावणार, ट्रायल सुरु

BKC to Worli Metro Launch Soon: आता कुलाबा ते सीप्झ मेट्रो मार्गिकेचा पुढचा टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ट्रायल सध्या सुरु आहेत.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा पुढचा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिकच सोपा होणार आहे. बीकेसी ते आचार्च अत्रे चौक म्हणजेच वरळी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो लवकरच धावणार आहे. यामुळे बीकेसी ते कुलाबा या मार्गात अजून काही स्थानके जोडली जाणार आहे. (Metro)

सध्या बीकेसी ते वरळी या मार्गावरच्या मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावरील सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. यासाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांना बोलावले आहे. या चाचणीनंतर सीएमआरआस प्रमाणपत्र मिळताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास खूप सोपा होणार आहे. (BKC to Worli Metro)

एमएसआरसीकडून हा मेट्रो सुरु केला जाणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या सध्या घेतल्या जात आहे. हा मेट्रो मार्ग खुला करण्यासाठी जी परवानगी लागणार आहे ती मिळाल्यानंतर लगेचच मेट्रो मार्ग सुरु केला जाणार आहे. यानुसार पुढच्या महिन्यात सीएमआरएसला तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे, असं एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सध्या मेट्रोची ट्रायल रन सुरु आहे. याचसोबत कुलाबा ते आरेच्या मध्ये मेट्रो ३ च्या कॉरिडॉरची निर्मिती केली जात होती. विधानसभा निवडणुका होण्याआधी आरे ते बीकेसी मेट्रो सुरु झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा टप्पा देखील सुरु केला जाणार आहे. या मेट्रो लाइनचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT