Pune Metro: पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, शिवाजीनगर मेट्रोला ऑक्टोबरचा मुहूर्त; प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण

Pune Metro: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होण्याची माहिती दिली. या मार्गामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
pune metro
pune metroyandex
Published On

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान सुरू होणाऱ्या मेट्रो मार्गिकेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हा मेट्रो मार्ग आगामी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. हे मार्ग सुरू झाल्यानंतर, पुण्यातील वाहतूक कोंडीच्या समस्येत निश्चितच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मात्र, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी नागरिकांना आणखी आठ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. प्रकल्पाच्या ८२ टक्के काम पूर्ण झाले असून, रुळ (लोहमार्ग) आणि ‘डक्ट’ (स्ट्रक्चरल) टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

pune metro
Pune News: पुण्यातल्या पाण्यात घातक विषाणू, जीबीएस उद्रेकानंतर पालिकेची तपासणी मोहीम

त्याचबरोबर, मेट्रो मार्गावर असलेल्या २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) आणि विद्यूत यंत्रणा कामे देखील अंतिम अवस्थेत आहेत. या सर्व कामांवर लक्ष ठेवून, सप्टेंबर महिन्यापर्यंत चाचणी घेण्याचे ठरले आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्व अंतिम कामे पूर्ण होईल आणि पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात मेट्रो मार्गिका धावायला सुरुवात करेल.

pune metro
Success Story: सासरचा विरोध, जबाबदाऱ्या अन् कठीण वाटचाल; मंजरी जरुहर यांचा आयपीएस होण्यापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास

हा मेट्रो प्रकल्प पुण्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विशेषतः हिंजवडी, बालेवाडी, शिवाजीनगर आणि इतर प्रमुख भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे, जे पुणेकरांसाठी एक मोठा दिलासा ठरेल. तथापि, हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख निश्चित असली तरी, त्यातील अंतिम टप्प्यातील कामे आणि चाचण्या यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

pune metro
Maharashtra Weather: महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही, राज्यातील तापमानात पुन्हा वाढ, तापमान ३६ अंश सेल्सिअसवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com