Pune Metro: २१ वर्षीय तरूणानं मेट्रो स्टेशनवरून उडी मारली, नंतर रस्त्यावर गाडीनं चिरडलं

Youth Killed himself due to financial issues: एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उडी मारल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. पुणे हादरलं.
Crime News
Crime NewsSaam Tv News
Published On

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उडी मारल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी २४ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवर एका २१ वर्षीय तरूणानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडलं. सुजल संजय मानकर असं मृत तरूणाचे नाव आहे.

Crime News
Sharad Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर शरद पवार स्पष्टच बोलले, म्हणाले... नैतिकता आणि यांचा संबंधच नाही

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल मानकर डीवाय पाटील कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोमवारी सायंकाळी तो संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर चढला आणि थेट रस्त्यावर उडी मारली.

Crime News
IIT Baba Memes: भारताच्या विजयानंतर IIT बाबा ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; काय होता बाबाचा दावा?

रस्त्यावर पडल्यानंतर त्याला एका वाहनाने चिरडलं. मुलाला गाडीने चिरडल्यानंतर स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने कुटुबांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करून मृत्यू करत असल्याचं नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com