IIT Baba Memes: भारताच्या विजयानंतर IIT बाबा ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; काय होता बाबाचा दावा?

India vs Pakistan Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल आयआयटी बाबांनी एक भाकीत केलं होतं. त्यांनी केलेलं भाकीत चुकीचं ठरलं.
Viral
ViralSaam Tv News
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल आयआयटी बाबांनी एक भाकीत केलं होतं. त्याने म्हटले होतं की भारत पाकिस्तानविरुद्ध हरेल. पण त्यांनी केलेलं भाकीत चुकीचं ठरलं. दुबईत झालेल्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

तोंडघशी पडल्यानंतर आयआयटी बाबा अर्थात अभय सिंगचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

सोशल मीडियावर आयआयटी बाबा ट्रोल

भारताचा दणदणीत विजय

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५वा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २४१ धावा केल्या. नंतर भारताने ६ विकेट्सने सामना जिंकला.

भारतीय संघाकडून विराट कोहलीने शतक झळकावले. १०० धावा काढल्यानंतर तो नाबाद राहिला. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले. आता संघ २ मार्च रोजी न्यूझीलंडशी सामना करण्यास तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com