Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बीकेसी ते वरळी मेट्रो पुढच्या महिन्यापासून ट्रॅकवर

Metro Phase 2 Starting From April: एप्रिल महिन्यापासून बीकेसी ते वरळीपर्यंत मेट्रो धावण्याची शक्यता आहे. या फेज २ ची ट्रायल सध्या सुरु आहे. लवकरच मेट्रो धावणार आहे.
Metro
MetroSaam Tv
Published On

मुंबईत सगळीकडे मेट्रोचे जाळे पसरणार आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. आरे ते बीकेसी मेट्रो सुरु झाली आहे. त्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मेट्रो सेवेच्या विस्तारासाठी काम करत आहे. एमएमआरसीएल एप्रिलपर्यंत आचार्य अत्रे चौकपर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Mumbai Metro Phase 2)

Metro
Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! मेट्रोचे आणखी २ नवीन मार्ग होणार, कुठून-कुठपर्यंत धावणार? कसा आहे मेगाप्लान?

मेट्रोचा दुसरा फेज लवकरच सुरु हहोणार आहे. या दुसऱ्या फेजमध्ये बीकेसी ते वरळीपर्यंत मेट्रोल धावणार आहे. लवकरच बीकेसी ते वरळीपर्यंतच्या मेट्रो मार्गावर ट्रायल रन सुरु होणार आहे.

याबाबत एमएमईरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या फेजमध्ये सेवा सुरु करण्यासाठी ट्रायल रन अवधी कमी होणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये जास्त नवीन उपकरण लावले गेले नाही. फक्त सर्व्हिसचा विस्तार केला जाणार आहे. यामुळे बीकेसी ते वरळी ही ट्रायल प्रक्रिया होण्यास जास्त वेळ लागणार नाहीये. त्यामुळे फेज २ मेट्रो लवकरच सुरु केली जाईल.ट्रायल प्रक्रिया कमी कालावधीत झाल्यावर सीएमआरएस सर्टिफिकेटसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही.

याचसोबत सध्या कुलाबा ते आरेच्या मद्ये मेट्रो ३ च्या कॉरिडॉरची निर्मिती केली जात आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी आरे ते बीकेसी मेट्रो सुरु केली होती. त्यानंतर आता कुलाबा ते बीकेसी मेट्रोदेखील सुरु केली जाणार आहे. मेट्रो लाइनचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच ही मेट्रोदेखील धावणार आहे.

Metro
Metro Viral Video: मेट्रोमध्ये कपलचं रोमान्स, किस करताना पाहून बायका संतापल्या, चोप चोप चोपलं; VIDEO व्हायरल

मेट्रो फेज १ सुरु झाली आहे. त्यानंतर आता मेट्रो फेज २देखील सुरु केले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. एप्रिल महिन्यापर्यंत या मेट्रोचा विस्तार होऊ शकतो. यासाठी ट्रायल रन सुरु आहे.

Metro
Metro News: मीरा रोड ते विरार प्रवास होणार सुसाट! मेट्रोच्या कामाला सुरूवात; कुठून कुठपर्यंत धावणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com