Metro Viral Video: मेट्रोमध्ये कपलचं रोमान्स, किस करताना पाहून बायका संतापल्या, चोप चोप चोपलं; VIDEO व्हायरल

Delhi Metro public behavior issue: दिल्ली मेट्रोमध्ये एक कपल अश्लील चाळे करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नंतर काही बायकांनी कपलला फटकारले.
Viral Video
Viral VideoSaam Tv News
Published On

दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. कुणी मेट्रोमध्ये डान्स करतं, तर कुणी रिल तयार करून प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये एक कपल अश्लील चाळे करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नंतर काही बायकांनी कपलला फटकारले. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महिलांमधील भांडणे, जोडप्यांमधील प्रेमसंबंध, रिल आणि रोमान्समुळे दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. दिल्ली मेट्रोमध्ये एका जोडप्याचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

Viral Video
Delhi Railway Station: माणुसकी संपली! चेंगराचेंगरीत चोरट्यांनी केला हातसाफ, मृतांच्या अंगावरील सोनं गायब; खिसे कापून पैसेही लुटले

व्हायरल व्हिडिओमध्ये कपल अश्लील चाळे करताना दिसत आहे. हे आक्षेपार्ह कृत्य करत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या काही बायकांनी पाहिले. दोन बायकांनी जोडप्याला सगळ्यांसमोर फटकारले. बाचाबाचीमध्ये काही बायकांनी कपलवर हात देखील उगारला आहे.

Viral Video
Nagpur Crime: कामावरून काढल्याचा राग अनावर, दुचाकी पेटवली आणि जीव दिला, नागपूर हादरलं

सार्वजनिक ठिकाणी किस करणं चुकीचं म्हणत बायकांनी कपलला धाऱ्यावर धरलं. या भांडणाचा व्हिडिओ काहींनी शुट केला आणि सोशल मीडियात व्हायरल केला. सार्वजनिक उघडपणे अश्लील कृत्य करणं चुकीचं, असं म्हणत नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com