
शनिवारी १५ फेब्रुवारीची रात्र अनेकांसाठी काळरात्र ठरली. दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. लोकांनी एकमेकांना चिरडत रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, रेल्वे स्टेशनवर एक अमानुष कृत्य घडलं आहे. काही चोरट्यांनी चेंगराचेंगरीत जखमी आणि मृत झालेल्या लोकांच्या दागिने आणि खिश्यावर डल्ला मारला आहे. पाकिटमारांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली तेव्हा काही चोरटे ब्लेड आणि चाकू वापरून लोकांचे पैसे आणि दागिने चोरत होते. अनेक लोक चाकू आणि ब्लेडमुळे जखमी झाले होते. पाकिटमारांच्या या लज्जास्पद कृत्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर जखमींना मदत करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागली होती.
स्टेशनवर उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, रात्री ८ किंवा वाजेच्या दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून एक अनाउंसमेंट करण्यात आली होती. ट्रेन दुसर्या प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. यामुळे लोक एका प्लॅटफॉर्मवरून दूसर्या प्लॅटफॉर्मवर पळू लागले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली. ज्यात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला.
मदत जाहीर
दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसेच दिल्लीचे उपराज्यपाल आणि विरोधकांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना अडीच लाख रूपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.