Mumbai Air Pollution: नागरिकांनो काळजी घ्या! मुंबईच्या हवेची गुणवत्ता आणखी बिघडली, कुलाबा आणि कांदिवलीची हवा अधिक धोकादायक

Air Pollution In Mumbai: मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे, ज्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हवा प्रदूषित झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Mumbai
Mumbaiyandex
Published On

मुंबईत पुन्हा एकदा वायू प्रदूषणाची समस्या वाढली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हवा प्रदूषित झाल्याची नोंद करण्यात आली आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांची आरोग्यस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, कुलाबा आणि कांदिवली या भागांमध्ये हवा प्रदूषणाची पातळी 'प्रदूषित' श्रेणीमध्ये गेली आहे. हवेतील प्रदूषणाचे मुख्य कारण शहरीकरण, वाहतूक, बांधकामांचे काम करणारी वायूद्रव्ये आहेत.

संपूर्ण नोव्हेंबर महिना मुंबईकरांनी प्रदुषित हवा अनुभवल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीस हवेची गुणवत्ता थोडी सुधारली होती. मात्र, मुंबईवरील फेंगल चक्रीवादळाच्या प्रभाव संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा मुंबईची हवा प्रदुषित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. AQI 200 च्या आसपास असताना, हवा गंभीरपणे प्रदूषित मानली जाते. यामुळे अस्थमा, श्वसनाची समस्या आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींना अधिक त्रास होऊ शकतो. वयस्कर, लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी ही हवा खूप धोकादायक ठरू शकते.

Mumbai
Kangana Ranaut: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी कंगना रणौतचे मोठे वक्तव्य, पुरुषांनाच केलं टार्गेट

मुंबईतील वायू प्रदूषणाची वाढती समस्या आगामी हिवाळ्यात आणखी गंभीर होऊ शकते. प्रशासनाने नागरिकांना बाहेर जाण्यापूर्वी मास्क घालण्याचे आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना अधिक काळ घरामध्ये राहण्याचे निर्देश दिले आहेत. शासकीय यंत्रणांनी तातडीने उपाययोजना सुरू केली असून, प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय शोधण्यावर काम सुरू आहे.

Mumbai
Winter & Arthritis: हिवाळ्याच्या ऋतूत सांधेदुखीच्या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या त्याचे कारण काय

5 डिसेंबरपर्यंत अनेक भागात AQI 150 च्या वर होता, पण आता त्यातही थोडीशी घट झाली आहे. आता बहुतांश भागात AQI 150 पेक्षा कमी नोंदवला जात आहे. गुरुवारी मुंबईचा सरासरी AQI १३७ नोंदवला गेला. बोरिवलीतील AQI 94 आणि भांडुपमध्ये AQI 98 मध्ये सर्वोत्तम हवेची गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे, जी समाधानकारक आहे.

Mumbai
Tourist Destinations : 2024 मध्ये ही पर्यटनस्थळं ठरली सुपरहिट, तुम्ही इथे गेलात का? यादी बघा!

इतर क्षेत्रांच्या तुलनेत, गोवंडीमध्ये सर्वाधिक 195 एक्यूआय नोंदवले गेले. हवामान विभागाच्या मते, हवेच्या गुणवत्तेची पातळी अजूनही असमाधानकारक आहे. जसजसे तापमान वाढते आणि वारा वाहतो, तसतसे प्रदूषण साफ होते. तापमानात घट झाल्यामुळे वातावरणात प्रदूषण कायम राहते. प्रदूषणाच्या पातळीत चढ-उतार दिसून येण्याचे हे एक कारण आहे.

Mumbai
Beed: मस्साजोग खून प्रकरणी वातावरण तापलं, भाजप- ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com