Kangana Ranaut: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी कंगना रणौतचे मोठे वक्तव्य, पुरुषांनाच केलं टार्गेट

Kangana Ranaut Big Statement: भाजप खासदार कंगना रणौत यांनी बेंगळुरूच्या इंजिनीअरच्या मृत्यूचा निषेध करत याला "बनावट स्त्रीवाद" म्हटले आहे.
Kangana Ranaut:
Kangana Ranautgoogle
Published On

अभिनेत्री राजकारणी बनलेली कंगना रणौतने बुधवारी बेंगळुरूच्या एका इंजिनीअरच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला, ज्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबाच्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत तिने त्यांच्या पतींकडून पैसे उकळण्यासाठी बनावट स्त्रीवादी कायद्याच्या गैरवापरावर टीका केली.

भाजप नेत्या आणि मंडीच्या खासदार कंगना रणौत यांनी या घटनेला ‘बनावट स्त्रीवाद’ म्हणत निषेध व्यक्त केला. ९९ टक्के चूकी ही पुरुषांचीच असते त्यामुळे अशा चुकाही होतात असे कंगना रणौत म्हणाली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असल्याचे भाजप खासदार म्हणाले. पुरुषांना बळी पडणाऱ्या अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालण्यासाठी एक संस्था असावी, असेही त्या म्हणाल्या.

Kangana Ranaut:
Nashik: आता ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! नाशिकमध्ये १९३ गावांत निवडणुका, कोण मारणार बाजी?

संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कंगना रणौतने संवाद साधताना म्हटलं की अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देश हादरला आहे आणि शोक व्यक्त करत आहे. एका तरुणाचा व्हिडिओ मनाला सुन्न करणारा आहे. आपल्या देशात लग्न ही एक परंपरा आहे. पण या परंपरेमध्ये ज्या वेळी पुरूषप्रधान संस्कृतीची घुसघोरी होते त्यावेळी असे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे लग्न या परंपरेत अडचणी येतात. त्यातूनच हे प्रकार घडतात असं ही त्या म्हणाल्या.

Kangana Ranaut:
Rajasthan: 150 फूट बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षीय मुलाचा मृत्यू, 55 तास चालले बचावकार्य

बेंगळुरूचे इंजिनीअर, अतुल सुभाष, आत्महत्येने मरण पावले, त्यांनी 24 पानांची चिठ्ठी आणि 80 मिनिटांचा व्हिडीओ आपल्या त्रासासाठी पत्नी, तिचे कुटुंब आणि न्यायाधीश यांना जबाबदार धरला. सुभाषने त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून अनेक वर्षांचा छळ केल्याचा आरोप केला आणि त्यांनी त्याच्यावर अनेक खटले दाखल केले.

Kangana Ranaut:
Kolhapur: धक्कादायक! पावणेदोन लाखांची लाच घेताना वकिलाला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com