Pune Ring Road Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Ring Road: पुणेकरांची वाहतूक कोंडी फुटणार! रिंग रोड संदर्भात मोठा निर्णय, कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार

PMRDA Ring Road News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. पुण्यात रिंग रोड कनेक्टिव्हिटी अजून वाढणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुण्याची वाहतूक कोंडी आता लवकरच फुटणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग रोड कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणामधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित ‘रिंग रोड’ची कनेटिव्हिटी वाढविण्यात येणार आहे. या रिंग रोडला जोडणारे पंधरा महत्त्वाचे इंटरचेंज विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी १४५ कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

पीएमआरडीए’चे भौगोलिक क्षेत्रफळ ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर एवढे असून, त्यामध्ये ९ तालुके आणि ६९७ गावांचा समावेश आहे. त्यानुसार पुणे आणि परिसरातील दळणवळण गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांसाठी ‘पीएमआरडी’ने त्यांच्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदी केल्या आहेत. नियोजित वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच, ‘रिंग रोड’ला जोडणारे १५ इंटरचेंज विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी मेट्रोदेखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आता लवकरच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरु होणार आहे.हा मेट्रो मार्ग ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा २३.३ किलोमीटर आहे. या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही मेट्रो पावसाळ्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केली जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी निश्चितच कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT