
पुण्यात घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पुणेकरांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पीएमआरडीएच्या सदनिकांची आज सोडत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किंमतीत पुणेकरांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. (PMRDA Lottery)
पुणे महानगर विकास प्राधिकरण पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथी घरांची लॉटरी निघणार आहे. ही घरे परवडणाऱ्या किंमतीत सर्वसामान्यांना घेता येणार आहे. आज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार आहे.
पुण्यातील पीएमआरडीएच्या १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी अनेकांनी अर्ज केले होते. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३२५६ अर्जदार पात्र झाले. तर उरलेले १५ अर्ज अपात्र ठरले होते. अर्जदारांना पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई पुण्यासारख्या शहरात स्वतः चे घर घेणे हे अनेकांना जमत नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांना कमी किंमतीत परवडणारी घरे मिळावीत, यासाठी सरकारने काही योजना राबवल्या आहे. यात म्हाडा, सिडको आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा समावेश आहे. या योजनांमध्ये अर्ज करुन तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत स्वतः ची घरे घेऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.