Pune Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

Pune Political News : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना मोठा धक्का बसलाय. कोल्हेंच्या जवळच्या कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रोहिदास गाडगे

निवडणुकीच्या तोंडावर अमोल कोल्हेंना मोठा धक्का बसलाय

खासदार कोल्हे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश केलाय

अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे खेडमधील राजकीय समीकरण बदलणार

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांना मोठा हादरा बसला आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा जवळचा कार्यकर्ता अतुल देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. देशमुखांच्या पक्ष प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेत पक्षप्रवेश करत अतुल देशमुखांनी शिवसेनेने स्वबळाचा नारा द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी नगरपालिका स्वबळावर मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी केली कार्यकर्तेही तयार आहेत, फक्त आदेश द्या, असंही अतुल देशमुखांनी म्हटलं.

अतुल देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंनी उपस्थितांना संबोधित केले. भाषण सुरु होताच लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ म्हणत सभेला लाडक्या बहिणी जास्त असल्याचे त्यांनी म्हटले. मी अतुल देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असं जाहीर करतो. त्यांच्यासोबतच्या सर्वांचे स्वागत आहे. आपलं नाव अतुल आहे. अतुलनीय काम करायचे. विरोधकांना आडवं करायचं. चाकणचे राखण भगव्याला करायचे. लोक म्हणतात भगव्याचे ठाणं, आता भगव्याचे पुणेही करायचं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाण्यानंतर पुणे ताब्यात घेण्याची घोषणा केली.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्याला भगवा करण्याची आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, अतुल देशमुख यांनी योग्यवेळी भगवा खांद्यावर घेतला'.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणले, 'मी जास्त टीका करत नाही. मला भकास म्हणतात. स्वत: मुख्यमंत्री असताना घरात बसले. लोकांना गरज असताना बाहेर पडले पाहिजे आणि आता बाहेर पडता. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार असून ते आम्ही कधीही विसरणार नाही, कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ते दौरा करत फिरतात आणि म्हणतात, माझ्या हातात काही नाही, असं सांगता. मग फिरता कशाला'.

'आमचा कार्यकर्त्यांचा मानसन्मान देणारा पक्ष आहे. अतुल देशमुख यांच्या प्रवेशानंतर आता आगामी निवडणुकीची आखणी करायची आहे. देशमुखांच्या प्रवेशाने अनेकांना धक्का बसेल. पण खरा धक्का येणाऱ्या निवडणुकीत द्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंनी ‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश परदेशीला सुनावलं; एकाच ठिकाणी राहा|VIDEO

Shocking: हृदयद्रावक! गरोदर बायकोच्या मृ्त्यूनंतर काही तासांत नवऱ्याने सोडले प्राण, एकाच ठिकाणी दोघांवर अंत्यसंस्कार; नेमकं घडलं काय?

Jaggery Benefits: हिवाळ्यात गूळ खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Shweta Tiwari Photos: लाल चोळी अन् पिवळी साडी, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून तरूणाई झाली घायाळ

Maharashtra Live News Update: मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदावरीची आरती

SCROLL FOR NEXT