Kurla Best Bus Accident : Saam tv
मुंबई/पुणे

Kurla Best Bus Accident : रस्त्यावरून चालायला जागा नाही, लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भीषण अपघातानंतर चाचाने केला आक्रोश

Mumbai Kurla Best Bus Accident : मुंबईच्या कुर्ला येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर स्थानिकांनी सरकारवर संताप व्यक्त केला.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बसचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. कुर्ल्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर जवळील या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. यावेळी अपघातानंतर उपस्थित झालेल्या चाचाने एकच आक्रोश व्यक्त केला.

कुर्ला येथील प्रचंड गर्दी असलेल्या या भागात भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची घटना घडली. या भरधाव बेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांसहित अनेक वाहनांना धडक दिली. भरधाव बेस्ट बसच्या धडकेत एक रिक्षा चक्काचूर झाली. या अपघातात तिघांनी जीव गमावल्याने उपस्थित लोकांनी एक एकच आक्रोश व्यक्त केला. यावेळी उपस्थित झालेल्या ७० वर्षीय वृद्धाने अनेक सवाल उपस्थित केले.

घटनास्थळी उपस्थित ७० वर्षीय चाचाने म्हटलं की,'आवाज उचलला पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा जीव गेला आहे. लोकांना चालण्यासाठी जागा नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे. या अपघाताला जबाबदार कोण आहे? आमदार, खासदार, सरकार? कोण जबाबदार आहे. उद्या आपल्यावरही वेळ येईल. आमच्या मुलाबाळांचीही वेळ येईल'.

'मी सत्तर वर्षांचा आहे. या रोडचा कधी विस्तार झाला नाही. रस्ता छोटा झाला आहे. या रस्त्यावरून मोठमोठं वाहने येत आहेत. तंत्रज्ञान विकसित झालं तर प्रगती नाही, असं म्हणत या वयोवृद्धाने एकच आक्रोश व्यक्त केला. यावेळी रस्त्यावरील उपस्थितांनी त्यांच्या विधानाचे समर्थन दिलं. यावेळी इतर लोकांनी देखील सरकारवर संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Nearest Railway Station: वरळीपासून सर्वात जवळचे रेल्वेस्थानक कोणते आहे?

Uddhav And Raj Thackeray : ढोल वाजवत ठाकरे, मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष | VIDEO

SCROLL FOR NEXT