Accident : परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Gujrat Student Accident : गुजरातमध्ये परीक्षेला जाणार्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Accident
AccidentSaam tv
Published On

जूनागड : (Gujrat Student Accident) गुजरातच्या जूनागड जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जेतपूर-वेरावल महामार्गावर भंडुरी गावाजवळ सकाळी आठ वाजता घडला. कृष्णा हॉटेलजवळ भरधाव वेगात येणाऱ्या दोन कारची जोरदार टक्कर झाली, ज्यामुळे हा भयानक अपघात घडला. परीक्षा देण्यासाठी हे पाच विद्यार्थी कारमधून प्रवास करीत होते, मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले . त्याचवेळी दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा देखील मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र गाठण्याचे स्वप्न भंगले

एका कारमध्ये बसलेले पाच कॉलेज विद्यार्थी परीक्षेसाठी निघाले होते. अपघात इतका भीषण होती की, या विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींनाही प्राण गमवावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारने डिव्हायडर पार करून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

याआधीही गुजरातमध्ये झाले आहेत अनेक भीषण अपघात

याआधी 19 नोव्हेंबरला गुजरातच्या भरुच जिल्ह्यात मोठा अपघात झाला होता. जंबूसर-आमोद रस्त्यावर उभ्या ट्रकला एका ईको कारची धडक बसली होती. या अपघातात दोन महिला आणि दोन मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला होता. धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते.

दिवाळीच्या दिवशी पाटणमध्ये झालेला अपघात अजूनही स्मरणात

गुजरातच्या पाटण जिल्ह्यात दिवाळीच्या दिवशी रामगड गावाजवळ ऑल्टो कार आणि छोटा हत्ती टेम्पो यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. दिवाळी साजरी करण्यासाठी कुटुंब कडीहून वडा गावाकडे जात होते, पण अपघातामुळे त्यांचा आनंद दु:खात बदलला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गुजरातमधील वारंवार होणारे हे अपघात वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com