Gujarat Accident: गुजरातच्या जुनागडमध्ये भीषण अपघात, 7 जणांना दुर्देवी मृत्यू

Gujarat Car Accident: भरधाव वेगात आलेल्या एका कारने डिवायडरला धडक मारून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कारला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.
Gujarat Accident
Gujarat Accident
Published On

गुजरातच्या जुनागडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील जुनागडमध्ये सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. जेतपूर-सोमनाथ महामार्गावरील डिवायडरला धडकल्यानंतर कारचे नियंत्रण सुटून दुसऱ्या कारला धडक दिली. या अपघातात पाच विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भांडुरीजवळील कृष्णा हॉटेलजवळ हा अपघात झाला असून परीक्षा देण्यासाठी निघालेल्या कारमध्ये 5 महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करत होते, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचाही मृत्यू झाला. खूप भयंकर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Accident
Pune Railway Station: पुणे स्टेशनचे रुपडे पालटणार, नवीन प्लॅटफॉर्मचा आराखडा तयार, काय काय असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, एका वेगवान कारने डिवायडरला धडक मारली आणि पलीकडून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

Gujarat Accident
Mira-Bhyandar: मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी १४०६ झाडे कापणार, तर ५७४ झाडे काढून अन्यत्र लागवड

दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून त्यात प्रवास करणारे लोक बाहेर पडले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बडमालिया हाटी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.

Gujarat Accident
Pune Weather: पुणेकरांचा श्वास गुदमरला, 'या' ठिकाणाची हवा सर्वात प्रदूषित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com