Pune Railway Station: पुणे स्टेशनचे रुपडे पालटणार, नवीन प्लॅटफॉर्मचा आराखडा तयार, काय काय असणार?

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनचा यार्ड रिमॉडलिंग आणि नवीन प्लॅटफॉर्मचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे.
Pune Railway Station
Pune Railway StationSaam Tv
Published On

पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशी आणि गाड्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे या स्थानकाचे विकास होणे महत्त्वाचे आहे. पुणे रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून दररोज २००च्या आसपास गाड्या धावतात, तर दीड लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

या ठिकाणी सहा फलाट आहेत. पण त्यांची लांबी कमी असल्यामुळे २४ डब्यांच्या ट्रेन येथून सोडता येत नाहीत. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनचे यार्ड रिमॉडलिंगचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळखात पडून आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणच्या कामाला २०१६-१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. मात्र, ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

Pune Railway Station
Mumbai Local Train: पुणे, मुंबईतील 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ८ दिवस बंद, रेल्वेनं का घेतला निर्णय?

आता पुणे रेल्वे विभागाकडून पुणे रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरणच्या कामाबरोबरच प्लॅटफॉर्म वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचा आराखडा नुकताच रेल्वेने पूर्ण केला आहे. आता त्याला अंतिम मंजूरी देऊन त्याची निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, येत्या वर्षात पुणे रेल्वे स्थानकाची सर्व कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Pune Railway Station
Pune: पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे अवजड वाहनांना बंदी; कोणता रस्ता बंद, कोणता सुरू?

– २४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म

– १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म

– मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म

– एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल

– पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन

Pune Railway Station
PMPML Bus: पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून 76 लाखांहून अधिक दंड वसूल, १५ हजार प्रवाशांचा विनातिकीट प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com