
MMRDA ला मेट्रो 9 (दहिसर-मीरा भाईंदर) आणि मेट्रो 7A साठी भाईंदरजवळ डोंगरी येथे डेपो विकसित करण्यासाठी तीन कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. मध्यंतरी, MMRDA सध्या मेट्रो २A आणि ७ (अंधेरी पश्चिम-दहिसर-गुंदवली) सेवा देत असलेल्या चारकोप डेपोवर अवलंबून असेल. मेट्रो 7 लाईन 9 ला जोडलेले आहे. मीरा-भाईंदर मेट्रो कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरी येथील तब्बल १ हजार ४०६ झाडे कापली जाणार आहेत.
त्यातील ८३२ झाडांची कत्तल, तर ५७४ झाडे काढून अन्यत्र लागवड केली जाणार आहेत. ५७४ झाडांच्या पुनर्रोपणाचा दावा पालिकेने केला असली तरी आतापर्यंतचे पुनर्रोपणाचे दावे पोकळ ठरले आहेत. मीरा-भाईंदर मेट्रो कारशेड उभारण्यास भाईंदर भागात खासगी जमिनी मालक व विकासकांचा विरोध झाल्यानंतर कारशेड डोंगरी येथील सरकारी जमीन मौजे डोंगरी सर्व्हे क्र. १७, १८, १९ व २० पैकीच्या क्षेत्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या सरकारी व डोंगर पट्टयात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी महसूल विभागाने ही जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित केली आहे. मेट्रो कारशेडचे काम सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी केली असून या डोंगरपट्ट्यात असलेली १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत आहे.
ही झाडे काढून टाकण्याची परवानगी एमएमआरडीएच्या मेट्रो विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन कोठावळे यांनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे मागितली होती. इतक्या मोठ्या संख्येने झाडांची कत्तल केल्याचा मोठा फटका निसर्गासह पर्यावरणास होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.