
कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय. बेस्ट बसने अनेकांना उडवलं आहे. भरधाव बेस्ट बस कुर्ला येथील एलबीएस रोडजवळील मार्केटमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात घडलाय. बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने इतर वाहनांचे मोठे नुकसान झालंय. यात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झालीय. या घटनेनंतर आता घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत.
एलबीएस रोड अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. तेथे मार्केटसुद्धा आहे, तेथे भरधाव बस चालवण्यात आली. भरधाव बेस्टने अनेक वाहनांना धडक दिलीय. बेस्ट बसने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत होता. दरम्यान एका प्रत्यक्षदर्शीने बसच्या अपघाताची आपबीती सांगितली.
कासीफ नावाच्या व्यक्तीने बेस्ट बसचा अपघाताची आपबीती सांगितली. कासीफ आणि त्यांचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी आले होते. त्यांनी त्यांची कार टेम्पो आणि कारच्या आतमध्ये पार्क केली होती. तरीही बसने कारचा उडवलं असून कारचे मोठं नुकसान झालंय. आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये बसलो होतो परंतु त्याचवेळी बाहेरील व्यक्तींना आम्हाला सांगितलं की बाहेर अपघात झाला. तेव्हा बाहेर येऊन पाहिलं की बेस्टच्या बसने अनेकांना उडवलं होतं. अनेक गाड्यांना चिरडलं होतं. पहिल्यांदा इतका मोठा अपघात आपण पाहिल्याचं कासीफ म्हणाले.
आमच्या कारचे मोठं नुकसान झाल्याची माहिती कासीफ यांनी दिलीय. कदाचित बसचा फेल झाला असावा. किंवा चालकाने जाणूनबुजून टक्कर दिल्याचं कासीफ म्हणालेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पोलिसांनी घटनास्थळ गाठत गर्दीला बाजूला करत बचावकार्याला सुरुवात केलीय. जखमींना आणि मृतकांना तातडीने रुग्णालयात नेलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.