Vangani Gram Panchayat political clash latest news  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Badlapur : वांगणीतील राजकीय संघर्ष चिघळला; शिंदे गटाचे सदस्याला बेड्या, उपसरपंच शेलार अद्यापही फरार

Vangani Gram Panchayat political clash latest news : वांगणी ग्रामपंचायतीतील राजकीय संघर्ष आणखी चिघळला आहे. शिंदे गटाचे सदस्य रूपेश गवळी यांना अटक करण्यात आली असून उपसरपंच अमित शेलार अद्याप फरार असल्याचा आरोप आहे.

Mayuresh Kadav

Badlapur Vangani Attack Accused Arrested : वांगणी ग्रामपंचायतीमधील दोन सदस्यांमधला वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे इथलं राजकारण चांगलंच तापलंय. उपसरपंच अमित शेलार यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी शिंदे गटाचे ग्रामपंचायत सदस्य रूपेश गवळी यांना पोलिसांनी अटक केलीय. मात्र रूपेश गवळी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात अमित शेलार आरोपी असतानाही त्यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही? असा सवाल आता उपस्थित होतोय.

या प्रकरणामुळे बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी उपसरपंच अमित शेलार टीडीसीसी बँकेच्या निवडणूक प्रचारात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत दिसून आले होते. त्यांची अटक टाळण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडून पोलिसांवर दबाव आहे का? अशीही चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी अंतर्गत वादातून शिंदे गटाचे सदस्य रूपेश गवळी यांच्यावर हल्ला झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाली होती. या हल्ल्याचा कट उपसरपंच अमित शेलार यांनी रचल्याचा आरोप करण्यात आला होता तसच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनीच अमित शेलार यांच्या कार्यालयाबाहेर काही गुंडांनी तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

ही घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणात बदलापूर ग्रामीण पोलिसांनी सखोल चौकशी करत शिंदे गटाचे सदस्य रूपेश गवळी यांना कट रचल्याप्रकरणी अटक केलीय. त्यांच्यासोबत इतर तीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय. मात्र रूपेश गवळी हल्ला प्रकरणात उपसरपंच अमित शेलार यांना का अटक झाली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी अमित शेलार टीडीसीसी बँकेच्या निवडणूक प्रचारात तसच मतदानाच्या दिवशी दिसून आले. इतकच नाही तर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत जल्लोषही केला. त्यानंतरही अमित शेलार यांना अटक होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: अचानक सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण! २४ कॅरेट सोनं ₹९२० ने स्वस्त; पाहा आजचे दर

Maharashtra News Live Update: निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष विकला- संजय राऊत

Bollywood Actor : "३ महिन्याच्या लेकीचा मृत्यू..."; प्रसिद्धीच्या शिखरावर असताना बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर, जुना किस्सा होतोय व्हायरल

Ice Benefits : बर्फ खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात? शरीरातील बदल पाहून व्हाल थक्क

NAFED onion scam: नाफेड कांदा खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा! 'साम'कडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT