Shreya Maskar
अनेकदा हार्ट अटॅक येताना छातीत तीव्र वेदना, घाम येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसतात. मात्र, काही वेळा शरीराच्या त्वचेवरही विशिष्ट बदल जाणवू शकतात.
हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाला रक्त पंप करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. अशावेळी चेहरा किंवा त्वचा नेहमीपेक्षा फिकट दिसू शकते.
हार्ट अटॅकच्या वेळी काही रुग्णांना अचानक थंड घाम येतो. त्वचा थंड, ओलसर आणि चिकट वाटू शकते. विशेषतः छातीत दडपण, धाप लागणे किंवा मळमळ यांसोबत असे होत असल्यास हे गंभीर लक्षण असू शकते.
ओठ, जीभ किंवा त्वचेचा रंग निळसर अथवा करडसर होणे याला सायनोसिस म्हणतात. रक्तामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे असे होऊ शकते. हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित गंभीर समस्या यामागे असू शकतात.
कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक भरपूर घाम येणे हे हार्ट अटॅकचे एक लक्षण आहे. विशेषतः थंड घाम, छातीत दुखणे, अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास सावध राहा.
रक्ताभिसरणात गंभीर अडथळा निर्माण झाल्यास त्वचेचा रंग बदलू शकतो. बदलांसोबत चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे ही धोक्याची चिन्हे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.