Amla Benefits : रोज १ आवळा खाल्ल्याने 'हे' ५ आजार होतील बरे, त्यातील एक आहे लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण

Shreya Maskar

आवळा

आवळा औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा पदार्थ आहे. चवीला आंबट असणाऱ्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

Amla | pinterest

रक्तातील साखरेचे नियंत्रण

आवळ्यामधील काही वनस्पतीजन्य घटक शरीरातील चयापचय प्रक्रियेला आधार देऊ शकतात. आवळ्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Blood sugar control | pinterest

पचनक्रिया सुधारण्यास मदत

आवळ्यामध्ये फायबर असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास आणि नियमित मलविसर्जनास मदत होऊ शकते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी संतुलित आहारासोबत पुरेसे पाणी आणि फायबरयुक्त पदार्थ घेणे महत्त्वाचे आहे.

Help improve digestion | pinterest

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. तसेच शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करते.

Increases immunity | pinterest

शरीरातील सूज कमी करण्यास मदत

आवळ्यामध्ये पॉलीफेनॉल आणि इतर अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्यास मदत करू शकतात.

reduce swelling in the body | pinterest

हृदयाचे आरोग्य

आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. आवळ्याच्या सेवनाचा कोलेस्टेरॉल आणि रक्तातील चरबीच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. आजकाल हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

Heart health | pinterest

आवळा खाण्याची योग्य पद्धत

आवळा स्वच्छ धुऊन ताजा खाऊ शकता. आवळ्याचे छोटे तुकडे करून त्याचे सेवन करता येते. उकडलेला आवळा देखील आरोग्यास फायदेशीर ठरतो.

amla | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Custard Apple | AI PHOTO
येथे क्लिक करा...