Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Shreya Maskar

सीताफळ

सीताफळ हे चविष्ट आणि पौष्टिक फळ असून त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीराला प्रथिने, लोह, झिंक आणि विविध जीवनसत्त्वांची आवश्यकता असते.

Sitaphal

केस गळती

सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी, बी-समूहातील काही जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. सीताफळातील व्हिटॅमिन सी शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे केस गळती थांबते.

hair loss

केसांचे आरोग्य

सीताफळात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Hair health

केसांच्या आरोग्यासाठी सीताफळ कसे खावे?

सीताफळ पूर्ण पिकलेले असताना खावे. त्यातील काळ्या बिया काढून गर खावा. मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी सीताफळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

hair health

सीताफळाच्या बियांचे तेल

सीताफळाच्या बियांचे तेल केसांच्या मजबुती वाढवते. तेलाने टाळूची हलक्या हाताने मालिश केल्यास केसांची मुळे भक्कम होतात, केस मऊ आणि मुलायम होतात.

seed oil

सीताफळाच्या बियांची पावडर

सीताफळाच्या बियांची पावडर कोंडा आणि उवांसाठी रामबाण उपाय आहे. सीताफळाच्या बिया गोळा करून २ ते ३ दिवस नीट वाळवून घ्या. त्यानंतर या सुकलेल्या बियांचे बारीक पावडर तयार करा आणि ते गाळून घ्या.

powder

केसांच्या वाढीसाठी कोणते पदार्थ चांगले

केसांच्या वाढीसाठी डाळी, कडधान्ये, दूध, अंडी, सुका मेवा, बिया आणि हिरव्या पालेभाज्यांचाही आहारात समावेश करावा.

hair growth

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT : दिवाळीसाठी इन्स्टंट चकली रेसिपी, भाजणीशिवायही होईल तितकीच कुरकुरीत

Instant Chakli Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...