Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी इन्स्टंट चकली रेसिपी, भाजणीशिवायही होईल तितकीच कुरकुरीत

Shreya Maskar

दिवाळी

चकली हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. मात्र तुम्हाला भाजणीची चकली बनवायला जास्त वेळ नसेल झटपट अशापद्धतीने कुरकुरीत इंस्टंट चकली बनवा.

Diwali | pinterest

इंस्टंट चकली रेसिपी

इंस्टंट चकली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, बेसन, बटर, गरम तेल, तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Instant Chukli Recipe | pinterest

तांदळाचे पीठ

इंस्टंट चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या परातीत तांदळाचे पीठ आणि बेसन एकत्र घ्या. त्यामध्ये तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

Rice flour | pinterest

बटर

आता या मिश्रणात गरम तेल किंवा वितळलेले बटर घाला. चमच्याने किंवा हाताने मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. यामुळे चकल्या कुरकुरीत होण्यास मदत होते.

Butter | pinterest

पीठ मळून घ्या

आता थोडे थोडे पाणी घालून मऊसर आणि घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावे. पीठ मळल्यानंतर ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा.

Knead the flour | pinterest

कुरकुरीत चकली

चकलीच्या साच्याला आतून थोडे तेल लावा. त्यामध्ये तयार केलेले पीठ भरा. स्वच्छ प्लास्टिक शीट किंवा ताटावर गोलाकार चकल्या पाडून घ्या.

Chakli | pinterest

चकल्या तळून घ्या

पॅनमध्ये तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यामध्ये चकल्या सोडा. मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या चकल्या टिश्यू पेपरवर काढा. त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Fry the Chakli | pinterest

चकल्या कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स

पॅनमध्ये तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यामध्ये चकल्या सोडा. मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या चकल्या टिश्यू पेपरवर काढा. त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Chakli | pinterest

NEXT : फराळाच्या चिवड्यापासून ५ मिनिटांत बनवा चटपटीत भेळ, चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Faral Chivda Bhel Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...