Faral Chivda Bhel Recipe : फराळाच्या चिवड्यापासून ५ मिनिटांत बनवा चटपटीत भेळ, चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

Shreya Maskar

फराळाच्या चिवड्याची भेळ

घरात दिवाळीच्या फराळासाठी बनवलेला चिवडा उरला असेल, तर त्यापासून तुम्ही झटपट चविष्ट भेळ तयार करू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Chivda Bhel | pinterest

चिवड्याची भेळ साहित्य

चिवड्याची भेळ बनवण्यासाठी घरगुती पोह्यांचा चिवडा, बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी, लिंबाचा रस, बारीक शेव, कोथिंबीर , चवीनुसार मीठ आणि चाट मसाला इत्यादी साहित्य साहित्य लागते.

Ingredients for Chivda Bhel | pinterest

पोह्यांचा चिवडा

चिवड्याची भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात घरगुती पोह्यांचा चिवडा घ्या. चिवडा कुरकुरीत असेल तर भेळ अधिक चविष्ट लागते.

Poha Chivda | pinterest

कांदा-टोमॅटो

कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. उकडलेला बटाटा सोलून त्याचे छोटे तुकडे करा आणि हलकासा मॅश करा. चिवड्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि बटाट्याचे तुकडे घाला.

Onion and Tomato | pinterest

आंबट-गोड-तिखट चटणी

भेळीला तिखट आणि चटपटीत चव देण्यासाठी त्यात हिरवी चटणी घाला. आंबट-गोड चवीसाठी चिंचेची गोड चटणी मिसळा. चटणीचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

Chutneys | pinterest

लिंबाचा रस

आता त्यात चाट मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. भेळीची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी त्यात बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घाला.

Lemon Juice | pinterest

शेंगदाणे

सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर वरून भरपूर बारीक शेव घाला. आवडीनुसार थोडे भाजलेले शेंगदाणेही घालू शकता. तयार झालेली चिवड्याची भेळ एका प्लेटमध्ये काढा. वरून थोडा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करा.

Peanuts | pinterest

टीप

भेळ सर्व्ह करण्याच्या अगदी आधीच चटण्या मिसळा. अधिक कुरकुरीत चवीसाठी शेव आणि फरसाण शेवटी घाला. चिवडा आधीच खारट असल्यास मीठ कमी घाला.

Tip | pinterest

NEXT : शंकरपाळी फुलत नाही? मग पीठ मळताना वापरा 'ही' एक ट्रिक, होईल खारीसारखा खुसखुशीत

Shankarpali Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...