Accident : पहाटे भयंकर घडलं! कोस्टल रोडवर ६ वाहनांचा विचित्र अपघात; बोगद्यात गाड्या धडकल्या

Mumbai Coastal Road Accident: मुंबईतील कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीच्या बोगद्यात १३ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३३ वाजता सहा वाहनांचा अपघात झाला. एका वाहनाच्या बॉनेटमधून धूर निघाल्याने अग्निरोधक यंत्राच्या मदतीने आग विझवण्यात आली.
Mumbai Coastal Road  Accident
Mumbai Coastal Road Accident
Published On: 

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Coastal Road accident today : मुंबईतील कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीच्या बोगद्यात शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे सहा वाहनांचा अपघात झाला. मरीन ड्राइव्ह वाहतूक विभागाच्या हद्दीत CP 9 आणि CP 10 दरम्यान पहाटे २:३३ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Coastal Road tunnel accident news) या अपघातात सहाही वाहनांचे नुकसान झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. (Mumbai Coastal Road traffic update)

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीच्या बोगद्यातून वाहने जात असताना एकापाठोपाठ सहा वाहनांचा आपसात अपघात झाला. या अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनांपैकी एका वाहनाच्या बॉनेटमधून धूर निघू लागल्याने बोगद्यात आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आग पसरू नये म्हणून पोलिसांनी तातडीने अग्निरोधक यंत्राच्या (फायर एक्स्टिंग्विशर) मदतीने ती आटोक्यात आणली.

Mumbai Coastal Road  Accident
मध्यरात्री भयंकर घडलं! महायुतीच्या मंत्र्याच्या घरावर हल्ला; दगड अन् काचेच्या बाटल्या फेकल्या, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

घटनेची माहिती मिळताच मलबार हिल आणि गावदेवी पोलीस ठाण्यांचे रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त सुवर्णा शिंदे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर टोइंग व्हॅनच्या मदतीने अपघातग्रस्त सहाही वाहने बोगद्याबाहेर काढण्यात आली.

Mumbai Coastal Road  Accident
राष्ट्रवादीला जोरदार धक्का! तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेचा सुरुंग; बड्या नेत्यानं हातात घेतला धनुष्यबाण

या अपघातामुळे कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीवरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहने बोगद्याबाहेर काढल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीਤ सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.