Badlapur minor school girl abuse Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Protest: धक्कादायक! बदलापूर आंदोलन प्रकरणात पत्रकारांवरही गुन्हे दाखल; तोडफोड केल्याचा आरोप, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Badlapur School Case News Latest Update: बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांचा नवा प्रताप समोर आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात केसचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

अजय दुधाणे

बदलापूर, ता. १ सप्टेंबर २०२४

Badlapur Case News: बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यामुळे जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. अशातच बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांचा नवा प्रताप समोर आला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात केसचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

बदलापूर प्रकरणी पोलिसांचा प्रताप!

बदलापूरमधील प्रसिद्ध शाळेमध्ये अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला होता. या घटनेत पोलीस तसेच शाळा प्रशासनानेही सहकार्य न केल्याने बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन करत शाळेची तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांसकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये महिला पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणात श्रद्धा ठोंबरे यांना गुन्हे शाखेनं अटक करण्याचा इशारा देत चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

पत्रकारांवरही गुन्हे दाखल

आंदोलनाच्या दिवशी सकाळपासून श्रद्धा ठोंबरे या संबंधित शाळेबाहेर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वार्तांकन करत होत्या. मात्र आंदोलकांची संख्या वाढू लागताच श्रद्धा ठोंबरे यांना पोलिसांनी स्वतः गर्दीतून बाहेर काढले होते. यानंतर एकीकडे संतप्त आंदोलकांनी रेलरोको केला, तर दुसरीकडे शाळेचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी श्रद्धा ठोंबरे या सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्यासोबत शाळेच्या परिसरात होत्या.

मात्र आता या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात श्रद्धा ठोंबरे यांचं नाव आरोपी म्हणून दाखल करण्यात आलं. मात्र यामुळं हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट आल्यानं आता पोलिसांनी पत्रकारांनाच लक्ष्य करायला सुरुवात केल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT