Maharashtra Politics : वाचाळवीरांमुळे CM एकनाथ शिंदे अडचणीत; वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार का?

Shiv Sena Controversial Minister : वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांमुळे मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना चांगलीच अडचण झाली आहे..या वाचाळविरांना शिंदे आवर घालणार का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांमुळे मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना चांगलीच अडचण झाली आहे..या वाचाळविरांना शिंदे आवर घालणार का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर या मंत्र्यांनी शिंदेंची चांगलीच अडचण केली आहे.

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री शिंदे गटातील नेते तानाजी सावंत असो वा नेहमीच मित्रपक्षांवर थेट आरोप करत युतीत मिठाचा खडा पाडणारे माजी मंत्री रामदास कदम असोत किंवा शिक्षणमंत्री दिपक केसरकर असो...गेल्या काही दिवसांत शिंदे गटातील या वाचाळविरांनी अशी काही वक्तव्य केलीएत की यामुळे शिंदे गटच काय पण महायुतीही अडचणीत आलीये ...कधी शेतकऱ्यांवर तर कधी युतीतील मित्रपक्षांवर विखारी टीका या मंत्र्यांनी केल्यानं शिंदेंच्या अडचणीत वाढ झालीये...या वाचाळविरांनी काय काय वक्तव्य केली पाहूया...

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापलंय. त्यातच विरोधकांच्या हाती आयतं कोलीत शिंदे गटातील मंत्री देतायत. त्यामुळे विरोधकांना अधिकचं बळ मिळतंय....शिंदे गटातील मंत्री आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य काही नवी नाही..अब्दुल सत्तारांनी तर थेट महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली होती.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महायुतीत अजित पवार नकोसे? भाजप-शिंदे गटाकडून दादा टार्गेट? वाचा...

आमदार संतोष बांगर,आमदार प्रकाश सुर्वे, मंत्री गुलाबराव पाटील,आरोग्यमंत्री तानाजी सावंत या मंत्र्यांनी वेळोवेळी शिंदेंना अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालंय...त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का ? आणि यातुन हे वाचाळविर मंत्री काही बोध घेणार का हेच पाहायचं..नाहीतर ऐन विधानसभेत विरोधकांमुळे नाही तर स्वकीयांमुळेच शिंदेंच्या अडचणी वाढतील यात शंका नाही.

Maharashtra Politics
Viral Video: जंगल सफारीला आलं कुटुंब; अचानक कारवर चढले 3 चित्ते, पुढे जे घडलं ते भयंकरच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com