Palghar Politics : पालघरमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार? मविआ की महायुती? काय सांगतय मतदारसंघातील समीकरण

Palghar Constituency Election : यंदा पालघरमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे सांऱ्याचे लक्ष लागलेलं असणार आहे. या मतदागसंघात मविआ आणि महायुतीने जोरदार तयारी सुरु केली आहे.
पालघरमध्ये कोण विजयी गुलाल उधळणार? मविआ की महायुती? काय सांगतय मतदारसंघातील समीकरण
Palghar Politics Saam tv
Published On

पालघर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये हेवेदावे सुरु झाले आहेत. ठाण्याजवळील पालघर विधानसभा मतदारसंघावर महायुती आणि महाविकास आघाडीवर करडी नजर आहे. या विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे. मात्र, आता या मतदारसंघावर भाजपने दावा केल्याने या मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. तर महाविकास आघाडीनेही या मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा असून ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. वनगा आमदार असलेल्या पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक सुरु होण्यााधीच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिंदे गटात वाद पेटण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे.

पालघरमध्ये कोण विजयी गुलाल उधळणार? मविआ की महायुती? काय सांगतय मतदारसंघातील समीकरण
Kasaba Peth Assembly Constituency: कसबा पेठमध्ये पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगणार, कोण मारणार बाजी?

पालघर विधानसभा मतदारसंघांचे आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आहेत. दुसरीकडे याच मतदारसंघावर भाजपने दावा करायला सुरुवात केली आहे. लोकसभेचे तिकीट कापण्यात आलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना पक्षाने या मतदारसंघातून तयारी करायला सांगितल्याची माहिती आहे. या मतदारसंघा राजेंद्र गावित यांनी तयारी देखील सुरु केली आहे. खासदार राहिलेले राजेंद्र गावित सध्या पालघर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून बसल्याची माहिती मिळत आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने या मतदाकरसंघात नव्या मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे डॉ. विश्वास वळवी हे इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

पालघरमध्ये कोण विजयी गुलाल उधळणार? मविआ की महायुती? काय सांगतय मतदारसंघातील समीकरण
Kalamnuri Assembly Constituency: कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय? महाविकास आघाडी की महायुती, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

मागील विधानसभा निवडणुकीत कोण पडलं भारी?

पालघर विधानसभा हा पालघर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांनी बाजी मारली होती. वनगा हे ६८,०४० मताध्यिक्याने जिंकले. त्यांनी काँग्रेसच्या योगेश शंकर नाम यांचा पराभव केला. २०१६ साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडवणुकीत अमित घोडा विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. अमित घोडा यांनी १९ हजार मतांच्या फरकाने राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com