MP Crime: जिवापेक्षा पोहे प्रिय; नवऱ्याला पोहे बनवता येईना, संतापलेल्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

MP Gwalior Crime News : ग्वाल्हेरमध्ये पोहे न मिळाल्याने नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय. या लेखातील संपूर्ण माहिती आणि तपासात समाविष्ट असलेल्या पैलू जाणून घ्या.
MP Crime: जिवापेक्षा पोहे प्रिय; नवऱ्याला पोहे बनवता येईना, संतापलेल्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
MP CrimeSaam Tv
Published On

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवऱ्याला पोहे बनवता न आल्यानं एका नवविवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचललं. पोहे मिळाले नाहीत म्हणून महिलेने थेट जीवन संपवल्याची घटना घडलीय. या महिलेला पोहे खायचे होते तिच्या नवऱ्याला पोहे बनवता येत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

ग्वाल्हेरच्या मुरार भागात ही घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव कविता जदौन असं आहे. वर्षभरापूर्वीच पोहे न बनवण्यावरून कविता यांच त्यांचे पती बाळकिशन जदौन यांच्याशी भांडण झालं होतं. कविताने पतीला पोहे बनवायला सांगितले, पण बाळकिशनने पोहे बनवले नाहीत तेव्हा कविता यांना त्या गोष्टीचा राग आला. याच रागाच्या भरात त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.

ग्वाल्हेरच्या मुरार भागात ही घटना घडलीय. बालकिशन जदौन आणि त्यांची पत्नी कविता यांच्या लग्नाला जवळपास एक वर्ष झाले होतं. शनिवारी कविताने आपल्या पतीकडे पोहे खाण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांना पोहे बनवता आले नाही. नवऱ्यानं पोहे बनवले नाही याचा राग अनावर झाला त्याच रागाच्या भरात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कविताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अतिरिक्त एसपी निरंजन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता हिचा नुकताच विवाह झाला होता

त्यामुळे हुंड्यासाठी तिची छळवणुक होत होती का यासर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत. या घटनेप्रकरणी माहिती देतांना कविता यांचे पती म्हणाले, पोहे न बनवण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर कविताने हे पाऊल उचलले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस सर्व बाजूंनी तपास करताहेत. हुंड्यासाठी छळाचा अँगलही तपासात समाविष्ट करण्यात आलाय.

या घटनेमागील खरी कारणे शोधता, यावीत यासाठी पोलिसांनी कविता यांचे पती, सासरे आणि सासरच्या मंडळींचे जबाब नोंदवलाय. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीचे पुरावे आढळून आल्यास आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.

MP Crime: जिवापेक्षा पोहे प्रिय; नवऱ्याला पोहे बनवता येईना, संतापलेल्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
Wardha Crime: वडिलांच्या हत्येचा राग, दोघे भाऊ आरोपीला संपवायला निघाले, पोलिसांना माहिती मिळाली अन्... वर्ध्यात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com