Badlapur Case : बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट, निलंबित पोलिस निरीक्षकांची मुंबईत बदली!

Transfers of Police Inspectors; Badlapur Crime News Updates: महाराष्ट्र गृह विभागाने आज राज्यभरातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले. यामधील एका नावामुळे पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
Badlapur School Case
Badlapur minor school girl abuseSaam Tv
Published On

Badlapur Protest News: अल्पवलीय मुलीसोबत अमानवी कृत्य (Badlapur minor school girl abuse) केल्यामुळे बदलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी आंदोलन केले होते. याप्रकरणावर तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास विलंब केला म्हणून काही पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले होते. पण दोन दिवसांतच निलंबित अधिकाऱ्याची बदली (Transfers of Police Inspectors) करण्यात आल्याचं समोर आलेय. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र गृह विभागाने आज राज्यभरातील २२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले. यामधील एका नावामुळे पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. बदलापूर प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेलं असताना झालेल्या बदलीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Badlapur School Case
Badlapur Protest : बदलापूर घटनेची गंभीर दखल; आजच फास्ट ट्रॅक कोर्टात प्रस्ताव, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले? पाहा VIDEO

बुधवारी राज्य सरकारने बदलापूर प्रकरणी शुभदा शितोळे शिंदे यांच्यासह इतरांच्या निलंबनाचे आदेश तातडीने काढले होते. पण त्यानंतर लगेच त्यांची गुरवारी बदली कशी झाली ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. निलंबन झालेलं असताना बदली कशी? ठाण्यावरून मुंबईला बदली झालेली असताना निलंबनाचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Badlapur School Case
Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणानंतर इक्बाल चहल यांच्याकडे गृह खात्यात मोठी जबाबदारी

बदलापूरमधील एका नामांकीत शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलीसोबत अक्षय शिंदे यानं अत्याचार केले. पालकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. १२ तास पालकांना पोलीस स्टेशनमध्ये प्रतीक्षा करावी लागली. राजकीय हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पण पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत आपला संताप व्यक्त केला. १० तास बदलापूरकरांनी आंदोलन केलं. नागरिकांचा रोष पाहून गृह विभागाकडून पोलिसांचं निलंबित करण्यात आले. तसा अध्यादेशही काढण्यात आला. पण दोन दिवसांतच त्याला केराची टोपली दाखवल्याचं समोर आलेय. कारण, बदलापूर प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या शुभदा शितोळे शिंदे यांची आज मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Badlapur School Case
Badlapur School Case : बदलापुर अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल, आज सकाळी होणार तातडीची सुनावणी

कोण कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com