Police and villagers inspect the hilltop Khandoba temple premises after the ancient Shivling was reportedly stolen in Mulkhhed, Mulshi taluka. Saam Tv
मुंबई/पुणे

देवा तुझ्या देवळात चोरट्यांचा फड; डोंगरावरील मंदिरातून शिवलिंग पळवला

Ancient Shivling Stolen From Mulkhhed Khandoba Temple: मुळशी तालुक्यातील मुलखेड येथील डोंगरावरील प्राचीन खंडोबा मंदिरातील पुरातन शिवलिंग अज्ञात समाजकंटकांनी उकरून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: पिरंगुट मुलखेड आणि घोटवडे (ता.मुळशी) येथील दोन्ही गावांच्या हद्दीतील डोंगरावरील प्राचीन खंडोबा मंदिर आणि शिवमंदिर गाभाऱ्यातील पुरातन शिवलिंग काही समाज कंटकांनी उकरून काढून नेले आहे. शिवलिंगाच्या या विटंबनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी आणि त्यांचे पथक दाखल झालेले आहे. पंचनामा तसेच तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलिस आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलखेड येथील गावाच्या वायव्य दिशेला असलेल्या डोंगरमाथ्यावर वनविभागाच्या हद्दीत खंडोबा मंदीर आहे. देवाचे पुजारी शिवाजी तापकीर यांनी नेहमीप्रमाणे शिवलिंगाची तसेच अन्य मूर्तींची पूजा केली होती.

त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी काही भाविक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी शिवलिंगाच्या जागेवर दगडी कुंडी त्यांना आढळली होती. परंतु त्यांना कोणतीही शंका आली नव्हती. त्यानंतर आज शुक्रवारी काही भाविकांनी ही दगडी कुंडी बाजुला केली असता त्याखालील शिवलिंग गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. संतप्त भ ग्रामस्थांनी पौड पोलिस ठाण्याशी संपर्क करून ही घटना कळविली. त्यामुळे तातडीने तेथील वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

पंचनामा आणि तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. उकरून गायब केलेले शिवलिंग परिसरात फेकून दिले असावे त्याची किंवा तोडफोड केली असावी. त्याचा अंधश्रद्धेच्या कामासाठी उपयोग केला असावा अथवा अन्य कोणत्या कारणांसाठी हे शिवलिंग उखडून गायब केले असावे यासाठीचा पुढील तपास पौड पोलिस करीत आहेत.

अंधश्रद्धा आणि खोट्या समजुतीतून निर्माण झालेल्या आर्थिक मोहापायी ही घटना घडली असावी अशी शंका काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मंदिर डोंगरावर असल्याने सकाळी व संध्याकाळी मंदिरात दर्शनासाठी भाविक जातात. पण सोमवारी घ़टना घडूनही त्याची शंका आली नाही. आज ही घटना लक्षात आली असून अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तिला कठोर शासन झाले पाहिजे. काही महिन्यांपूर्वी पौड येथील शिवमंदिरातही विटंबणेची घटना घडली होती. त्यानंतर तालुक्यातील ही दुसरी घटना घडल्याने शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT