Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?

Delimitation Bill News Update: डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी आज शरद पवार यांना फोन करून चर्चा केली.
Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?
Delimitation BillSaam Tv
Published On: 

केंद्र सरकारकडून डिलिमिटेशन बिल सादर करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल सादर करण्यासाठी सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. डिलिमिटेशन बिलसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांशी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे यासंदर्भात चर्चा करण्यासाठीच इंडिया आघाडीने देखील महत्वाची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद -

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिल मांडताना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्य्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?
डीलिमिटेशनसाठी राज्यातील खासदारांना 150 कोटी; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

इंडिया आघाडीची बैठक -

संसदेच्या अधिवेशनासाठी विरोधकांची रणनीती ठरणार आहे. इंडीया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी होणार आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष सकाळी ११:३० वाजता या अधिवेशनावर चर्चा करणार आहेत. तर काँग्रेस आज दुपारी ४:३० वाजता आपली रणनीती निश्चित करेल. त्यानंतर उद्या सकाळी इंडिया आघाडीची बैठक होईल. इंडिया आघाडीच्या बैठकीला कोणते पक्ष गैरहजर राहतात यावर डिलिमिटेशन विधेयकाचं भवितव्य ठरणार आहे.

Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?
Political News: मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, सर्व खासदारांना तातडीने व्हिप जारी

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक -

२ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणाह आहे. एकाच आठवड्यात केंद्रीय कॅबिनेटची दुसऱ्यांदा बैठक होत आहे. बैठकीत डिलिमिटेशन विधेयक आणण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील खासदारांच्या मतदारसंघातील प्रकल्पांना मंजुरी देऊन झुकतं माप देत गळाला लावलं जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलासाठी हालचालींना वेग, इकडे काँग्रेसची बैठक, तिकडे भाजप नेत्यांचा शरद पवारांना फोन, काय होणार?
Delimitation Bill : भाजपच्या बाजारात खासदारांना १५० कोटी दर, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.