Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?

India Aghadi On Gyanesh Kumar: इंडिया आघाडी आज ज्ञानेश कुमारांविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. इंडिया आघाडीने १० नेत्यांचे शिष्टमंडळ तयार केले आहे.
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?
Gyanesh KumarSaam Tv
Published On: 
  • ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली

  • ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात १० जण

  • ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी

  • उद्या दिल्लीत सीजेपीचे आंदोलन होणार आहे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत सलग ३ दिवस आंदोलन केले. आज इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ ज्ञानेश कुमारांविरोधात राष्ट्रपतींकडे जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत तक्रार करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतींना भेटण्यासाठी इंडिया आघाडीने १० जणांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. भेटीची वेळ राष्ट्रपती यांच्याकडून दिली आहे की नाही? याबाबत मात्र स्पष्टता नाही. त्यासोबत अशी देखील माहिती समोर आली आहे की, इंडिया आघाडीचे खासदार आज सलग चौथ्या दिवशी दिल्लीमध्ये ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्याची शक्यता आहे.

शिष्टमंडळात असलेले सदस्य -

मल्लिकार्जुन खर्गे

राहुल गांधी

अखिलेश यादव

तेजस्वी यादव

ममता बॅनर्जी

सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरे / संजय राऊत

एम.ए. बेबी / दीपांकर भट्टाचार्य

ई.टी. मोहम्मद बशीर (IUML)

आंदोलनाकडे ठाकरेंची पाठ -

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील आंदोलनाकडे ठाकरेंच्या शिवसेनेने पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे. पहिला दिवस सोडता बाकी दिवशीच्या आंदोलनात पक्षाची अनुपस्थिती होती. आज होणाऱ्या राष्ट्रपतींच्या भेटीला ठाकरेंचे प्रतिनिधी अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांची शिष्टमंडळात नावं देण्यात आली आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ मिळाली तरी पक्षाचा प्रतिनिधी अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपी दिल्लीमध्ये १० ऑक्टोबर रोजी आंदोलन सुरू करणार आहे. पण या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरी देखील सीजेपी या आंदोलनावर ठाम आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रस्ते, रेल्वे आणि मेट्रो वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दिल्लीतील दोन प्रमुख रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेने अनेक मेल आणि एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?
Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार १० ऑक्टोबरच्या आधी राजीनामा देतील, बड्या राजकीय नेत्याचा दावा

९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजल्यानंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ च्या दरम्यान नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन येथे पोहोचणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वेने प्रवाशांना स्थानकावर पोहोचण्यापूर्वी आपल्या रेल्वेची स्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचसोबत, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. आज रात्री ९ वाजल्यापासून मेट्रो सेवा बंद करण्यात येणार आहेत.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडी राष्ट्रपतींकडे जाणार, १० जणांच्या शिष्टमंडळामध्ये कोणकोण?
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या जीवाला धोका, दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com