Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Congress Protest, Gyanesh Kumar : कथित 'वोट चोरी'च्या आरोपांवरून काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. १० ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
Congress nationwide protest against Gyanesh Kumar
Congress nationwide protest against Gyanesh KumarSaam TV
Published On: 

Congress nationwide protest against Gyanesh Kumar : निवडणूक प्रक्रियेत गडबड आणि 'वोट चोरी' होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जोरदार मोर्चा उघडला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत 'वोट बचाओ, देश बचाओ' या नावाने एक महिनाभर देशव्यापी आंदोलन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी आपले पद सोडेपर्यंत आणि निवडणूक पद्धतीत सुधारणा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत त्याला 'चीटिंग कमिशन ऑफ इंडिया' असे म्हटले आहे.

Congress nationwide protest against Gyanesh Kumar
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता 'या' दिवशी होणार जमा, वाचा मोठी अपडेट

आंदोलनाची रूपरेषा कशी असणार?

'इंडिया' (INDIA) आघाडीचे सर्व खासदार संसद भवनापासून थेट निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढणार आहेत. १० ते २० ऑक्टोबर दरम्यान जिल्हा स्तरावर निदर्शने केली जातील. त्यानंतर २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या काळात सर्व राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये 'वोट बचाओ, देश बचाओ, CEC हटाओ' रॅली आणि गावात चौपाल आयोजित केल्या जातील.त्याशिवाय ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून परस्पर वगळण्यात किंवा हटवण्यात आली आहेत, अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते मदत करतील.

Congress nationwide protest against Gyanesh Kumar
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

३ प्रमुख मागण्यांवर काँग्रेस ठाम:

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

  • मतदार याद्यांची सध्या सुरू असलेली पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी.

  • आगामी निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्यात याव्यात.

काँग्रेसने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आम आदमी पार्टी (AAP), डीएमके (DMK) आणि बीजेडी (BJD) यांसारख्या इतर विरोधी पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com