ज्ञानेश, इट्स डन ब्रो! राहुल गांधींचा ठिय्या; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

INDIA Bloc Demand Gyanesh Kumar Resignation: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर पोहोचले. पोलिसांनी खासदारांना अडवल्यानंतर आंदोलनाला नाट्यमय वळण मिळाले.
RAHUL GANDHI LEADS INDIA BLOC PROTEST DEMANDING GYANESH KUMAR’S RESIGNATION
RAHUL GANDHI LEADS INDIA BLOC PROTEST DEMANDING GYANESH KUMAR’S RESIGNATION
Published On: 

इंडिया आघाडीच्या खासदारांचे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक

आता बातमी आहे इंडिया आघाडीच्या एल्गारची. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी थेट निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर पोहचले..मात्र पोलिसांनी खासदारांची अडवणूक केल्यानंतर राहुल गांधींच्या गनिमी काव्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे कसे दणाणलेत. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Gyanesh, It's Done Bro... Time to Resign!" या आशयाचं पोस्टर राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या आंदोलनात हाती घेतलं आणि ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं. SIR प्रक्रियेद्वारे 13 कोटी मतदारांची नावं मतदार यादीतून हटवल्याचा आरोप करत 'इंडिया' आघाडीने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर जोरदार धडक दिली.ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेच्या मकर द्वारापासूून निघालेल्या या 'लोकशाही बचाव मोर्चा'त दिल्लीच्या रस्त्यांवर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

RAHUL GANDHI LEADS INDIA BLOC PROTEST DEMANDING GYANESH KUMAR’S RESIGNATION
एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ECI मुख्यालयात जाण्यासाठी आंदोलकांना रोखल्यावर

नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी गनिमी काव्याचा वापर करत थेट आकाशवाणी भवनातून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी आकाशवाणी भवनामार्गे ज्ञानेश कुमारांना भेटण्यासाठी आयोगाकडे पुढे जाण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी थेट बॅरिगेड्सवर चढले आणि ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र तब्बल 4 ते 5 तास पोलिसांनी राहुल गांधींसह 300 खासदारांना एकाच ठिकाणी रोखून धरलं. मोदी-शाहांनी देशातील लोकशाही हायजॅक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, ठाकरेसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही या आंदोलनात सहभागी झाले.

RAHUL GANDHI LEADS INDIA BLOC PROTEST DEMANDING GYANESH KUMAR’S RESIGNATION
निवडणूक आयोगाचं तात्काळ स्पष्टीकरण, १० महिन्यांत त्या १४ तक्रारी; राजकारणातही उडाली खळबळ

एका बाजूला विरोधकांनी रस्त्यावरची लढाई सुरू केलीय. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांबाबत गंभीर टिप्पणी केली असतानाच, विरोधकांच्या या रस्त्यावरील संघर्षामुळे सत्ताधारी आणि केंद्रीय निवडणूक आयोग बचावात्मक भूमिकेत आल्याचे दिसतयं. आता विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर ज्ञानेश कुमार राजीनामा देणार की कायदेशीर संरक्षणाचा फायदा घेत आयोगाचा कारभार असाच सुरु ठेवणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com