निवडणूक आयोगाचं तात्काळ स्पष्टीकरण, १० महिन्यांत त्या १४ तक्रारी; राजकारणातही उडाली खळबळ

Election Commission 14 Objections In 10 Months: निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. Indian Express रिपोर्टनुसार सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी 10 महिन्यांत किमान 14 वेळा एसआयआर, मतदार नोंदणी, नावं वगळणे आणि मतदार डेटाबेससंदर्भात आक्षेप नोंदवले.
ELECTION COMMISSION RIFT
ELECTION COMMISSION RIFTsaam tv
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशातील विरोधी पक्ष देखील आयोगावर गंभीर आरोप करत आहे. अशातच आता निवडणूक आयोगाचे दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी एसआयआर प्रक्रियेदरम्यान विविध राज्यांमध्ये मतदार यादीतून नावं वगळण्यासह अनेक मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली होती. गेल्या 10 महिन्यांत संधू आणि विवेक जोशी यांनी तब्बल 14 वेळा तक्रार केल्याचे उघडकीस आले आहे. ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयाविरोधात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील नावे हटवणे, अपील आणि निवडणूक आयोगाचा डेटाचे सॉफ्टवेअर या मुद्यावरून एका विरुद्ध दोन असा जोरदार सामना रंगला होता.

मात्र, आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं की, एसआयआरसह भारताच्या निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आले आहेत. या निर्णयांना मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती, असंही सूत्रांनी सांगितलं.

ELECTION COMMISSION RIFT
Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये काय?

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टमध्ये तीन सदस्यीय निवडणूक आयोगाच्या अंतर्गतच मतदार याद्यांच्या एसआयआरशी संबंधित मुद्द्यांवर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, तीनपैकी दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी अनेक वेळा एसआयआरशी संबंधित मुद्दे उपस्थित केले होते. देशभरात एसआयआरच्या अंमलबजावणीवर तीनही निवडणूक आयुक्त देखरेख करत असतानाच, सिंधू आणि जोशी यांनी मागील १० महिन्यांत किमान १४ वेळा अधिकृत नोंदीवर आपले आक्षेप नोंदवल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

ELECTION COMMISSION RIFT
Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

या आक्षेपांमध्ये अशा काही निर्णयांचा आणि आदेशाचा समावेश होता, जे त्यांच्या माहितीत नसताना घेण्यात आल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. विशेष म्हणजे यापैकी चार आक्षेप एकाच दिवशी नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

ELECTION COMMISSION RIFT
Eknath Shinde : सुरतमध्ये शिवसेना भवन बांधतायत, एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावरून संजय राऊतांचा घणाघाती टोला

एसआयआरच्या प्रक्रियेवरून विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. एसआयआरच्या माध्यमातून भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना समर्थन न करणाऱ्या मतदारांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच दोन निवडणूक आयुक्तांनीच निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरच आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com