CEC ज्ञानेश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली
गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला
ज्ञानेश कुमार यांना आधीच Z-प्लस सुरक्षा देण्यात आली
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. ज्ञानेश कुमार यांना यापूर्वीच Z-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, राजधानीत सुरू असलेली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनाही त्यांच्या स्तरावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवी दिल्ली जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी आंदोलनांचे वातावरण असल्याने सुरक्षा यंत्रणांना परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर आणि मध्य दिल्ली परिसरात आंदोलनांना वेग आला आहे. या आंदोलनांदरम्यान पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून काही आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
दरम्यान, Z-प्लस ही भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या प्रमुख सुरक्षा असून ती दुसऱ्या क्रमांकाची उच्च सुरक्षा मानली जाते. त्यापेक्षा वर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना विशेष संरक्षण म्हणजेच SPG सुरक्षा दिली जाते. दिल्लीतील वाढते आंदोलन आणि सुरक्षा लक्षात घेता, ज्ञानेश कुमार यांच्या निवासस्थानासह राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.