Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा

Pune Daund Azhar Sheikh Bhigwan Connection : पुण्यातील दौंडमधील माजी सरपंच अझर शेख याला पोलिसांनी अखेर अटक केली असून महसूल अधिकाऱ्याला मारहाण आणि इतर गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा
Pune Daund Azhar Sheikh Bhigwan ConnectionSaam Tv
Published On
Summary
  • दौंडमध्ये फरार माजी सरपंच अझर शेख अटकेत

  • महसूल अधिकाऱ्याला मारहाणीचा गंभीर आरोप

  • भिगवण प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा

  • पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची तयारी

मंगेश कचरे, बारामती

पुण्याच्या दौंड मधून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेखला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. या आरोपीचा भिगवण प्रकरणात देखील हात असल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अझर शेख हा भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा चुलता आहे. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता. दरम्यान तरुणीला पळवून नेण्यात अझर शेख याचा हात असल्याचा आरोप केला जात आहे.

Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा
Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

अझर शेख यासोबत युवराज मेंगावडे याला देखिल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणात अझर शेख याने स्वामी चिंचोली गावाच्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.या गुन्ह्यात तो फरार होता,अखेर त्याला अटक करण्यात आली असून त्याला दौंड न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा
Dombivli : डोंबिवलीतील 'त्या' विद्यार्थिनीच्या खात्यात २ कोटी ६० हजार; उल्हासनगर ते उत्तराखंड कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

भिगवण प्रकरण नेमकं काय ?

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासह लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. मात्र हा अपहरणाचा प्रकार बनावट असून तरुणी स्वतःच्या मर्जीने तरुणासोबत पळून गेल्याच उघड झालं. आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब तरुणीनं कोर्टात दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं म्हटलं. दरम्यान सुरवातीला तिने प्रियकरासोबत राहण्याचा कोर्टात जबाब नोंदवला. त्यानंतर इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉलद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. या सुनावणीत तरुणीने जबाब बदलत आपल्याला आईसोबत राहायचं असल्याचं म्हटलं. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तरुणीला सुरक्षिततेसाठी सुधारगृहात पाठवलं आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com