Pune : लग्नाच्या तीन महिन्यानंतर महिलेने संपवलं आयुष्य, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण

Pune Baner Ganga Bembalkar Sucide News : पुण्यातील बाणेर परिसरात नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाचा आरोप करत नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
Pune Baner Ganga Bembalkar Sucide News
Pune Baner Ganga Bembalkar Sucide NewsSaam tv
Published On
Summary
  • बाणेरमध्ये नवविवाहित महिलेची आत्महत्या

  • सासरच्या छळाचा गंभीर आरोप

  • घटनास्थळी सुसाईड नोट सापडली

  • पोलिस तपास सुरू

सागर आव्हाड, पुणे

Pune Baner Woman Sucide News पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच सासरच्या छळाला कंटाळून आणखी एका महिलेने आत्महत्या केली असल्याचं उघड झालं आहे. इमारतीवरून उडी मारून महिलेने जीवन संपवलं असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुण्यातील बाणेर परिसरात घडली आहे. मृत महिलेचं नाव गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव तेजस शिवा बेंबळकर असे आहे. तेजस यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतले आहे. तेजस आणि गंगा यांचा विवाह ३ महिन्यांपूर्वी झाला. मात्र लग्नानंतर गंगाला सुख मिळण्याऐवजी सासरच्या मंडळींकडून छळाला समोर जावं लागलं.

Pune Baner Ganga Bembalkar Sucide News
Rashmika-Vijay Wedding : लगीन घटिका समीप आली! रश्मिका-विजय आज अडकणार लग्नबंधनात; पाहा शाही लग्नाचा मुहूर्त कधीचा?

या छळाला कंटाळून नवविवाहितेने राहत्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली असल्याचा आरोप गंगाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. याप्रकरणी मृत पावलेल्या महिलेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,नवरा, सासू, नणंद आणि सासरे यांच्या विरोधात पुण्यातील बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Baner Ganga Bembalkar Sucide News
Pune : पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; भाजप कार्यकर्त्याला अटक; नेमकं काय आहे कनेक्शन? वाचा

पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून घटनास्थळी पंचनामा केला. त्यांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिलेने मृत्यूला स्वतः जबाबदार असल्याचे लिहिले मात्र महिलेच्या कुटुंबियांच्या आरोपांवरून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अजून कित्येक वैष्णवी आणि गंगांचा बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com