Ambernath Medical College Admission Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath News: केंद्राचा मोठा निर्णय, अंबरनाथमधील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या १०० जागांना मंजुरी, अ‍ॅडमिशन सुरु

Ambernath Medical College Admission: डॉक्टर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अंबरनाथमधील मेडिकल कॉलेजमध्ये १०० जागांसाठी अॅडमिशन सुरु करण्यात आले आहे.

Siddhi Hande

अजय दुधाणे, साम टिव्ही प्रतिनिधी

एमबीबीएसला (MBBS List) अॅडमिशन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस (MBBS)च्या १०० जागांना मंजुरी देण्यात आलीये. त्यामुळे आता १०० विद्यार्थ्यांना अंबरनाथच्या मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या MBBS च्या प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीपासून अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ शहरात मंजूर करण्यात आले आहे. या महाविद्यालयासाठी शासनाने जागा दिली आहे. तिथे पुढील काही वर्षात इमारतीची उभारणी केली जाणार आहे. तर सध्या अंबरनाथ पालिकेच्या ग्रीन सिटी परिसरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीत हे महाविद्यालय सुरू केलं जाणार आहे. MBBS च्या यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील एक फेरी झाली आहे.आता दुसऱ्या फेरीत अंबरनाथच्या मेडिकल कॉलेजचाही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेज मिळाले नाही त्यांच्यासाठी अजून एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

मेडिकल महाविद्यालयासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मागील १० वर्षांपासून मोठा पाठपुरावा केला होता. आता हे कॉलेज सुरू होत असल्यानं त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ठाणे जिल्ह्यासोबतच संपूर्ण कोकण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किणीकर यांनी दिली आहे. (Ambernath Medical College Admission Process)

अंबरनाथमधील या मेडिकल कॉलेजमुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील हे एकमेक मेडिकल कॉलेज असल्याने ठाणे आणि मुंबईसह इतर अनेक ठिकाणी असलेले विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊ शकतात. (Ambernath Medical College)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT