Assembly Election: पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती; कसब्यातील पोस्टर वॉरने वाढवली भाजपची डोकेदुखी

Pune Assembly Election: पुण्यातील कसबा मतदारसंघातील पोस्टर वॉरमुळे भाजपचं टेन्शन वाढलंय.
Assembly Election: पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती;  कसब्यातील पोस्टर वॉरने वाढवली भाजपची डोकेदुखी
Pune Assembly ElectionSaam tv
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून भाजप जोरात कामाला लागलीय. भाजप निवडणुकीच्या कामाला लागली हे जरी खरं असलं तरी भाजप उमेदवारीच्या दाव्यामुळे चिंतेत सापडलीय. राज्यातील विधानसभेतील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक पुण्यातील ४ मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढलीय.

पुण्यातील मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी चाचपणी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीसाठी मतदान घेण्यात आले. यात पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती दिली. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासलामध्ये विद्यमान आमदारांनाच पसंती दिली. बहुचर्चित कसबा विधानसभामध्ये हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्यातून एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातील उमेदवारीच्या दाव्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलयं.

Assembly Election: पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती;  कसब्यातील पोस्टर वॉरने वाढवली भाजपची डोकेदुखी
VIDEO | अमित शहांनी मुंबईत येणं टाळलं; सेना- भाजप वादावरून शहांचा मुंबईदौरा लांबणीवर

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. पुणे शहरामध्ये आज महायुतीमध्ये भाजपकडे असणाऱ्या सहा मतदारसंघांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला जात आहे. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये पोस्टर वार रंगल्याचे चित्र कसबा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे कसब्यातून लढण्यासाठी पुन्हा एकदा तयारी करत आहेत, तर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारीवर दावा ठोकण्यात आला आहे. रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत.

कसबा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पोटनिवडणुकीत पराभव होऊन देखील हेमंत रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या माध्यमातून त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिला. दुसरीकडे शहराध्यक्ष असणारे धीरज घाटे यांच्याकडून देखील उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Assembly Election: पुण्यातील ४ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती;  कसब्यातील पोस्टर वॉरने वाढवली भाजपची डोकेदुखी
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 'एक पाऊल पुढे', बड्या नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा

आज कसबा विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांकडून मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यात आल. यासाठी बंद लिफाफ्यामध्ये पसंती क्रमानुसार तीन नावे देण्यास सांगण्यात आलं आहे. मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, शहर, राज्य तसेच प्रदेशावर काम करणारे पदाधिकारी यांची मते यावेळी जाणून घेण्यात आली, हे बंद लिफाफे थेट प्रदेश कार्यालयामध्ये उघडले जाणार असून पक्षाकडून करण्यात आलेला सर्व्हे, मतदारसंघातील कामगिरी हे मुद्दे लक्षात घेत उमेदवारी निश्चित केली जाणार आहे.

कसबा मतदारसंघात शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख हेमंत रासने, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट इच्छुक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com